म्हणून निखिल राऊतला मिळाली कौतुकाची थाप

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2018 07:08 AM2018-04-16T07:08:38+5:302018-04-16T12:38:38+5:30

प्रेक्षकांकडून दाद मिळणे, कौतुकाची पाठीवर थाप मिळणे, ही कलाकारांसाठी खूप महत्त्वाची बाब असते.जेव्हा रसिक प्रेक्षक एखादी कलाकृती पाहून भारावून ...

So Nikhil Raut got the applause of applause | म्हणून निखिल राऊतला मिळाली कौतुकाची थाप

म्हणून निखिल राऊतला मिळाली कौतुकाची थाप

googlenewsNext
रेक्षकांकडून दाद मिळणे, कौतुकाची पाठीवर थाप मिळणे, ही कलाकारांसाठी खूप महत्त्वाची बाब असते.जेव्हा रसिक प्रेक्षक एखादी कलाकृती पाहून भारावून जातात आणि त्या कलाकाराला त्याच्या कामाची खरी पावती देतात, त्याच्या कामाचं भरभरून कौतुक करतात,तेव्हा रसिकांना 'माय बाप मानणार्‍या कलाकाराला सुध्दा  त्याच्या कामाचं, कष्टाचं, चिज झाल्यासारखं वाटतं. अशीच एक घटना निखिल राऊत या अभिनेत्यासोबत घडली आहे. "चॅलेंज" या नाटकामध्ये तो ' स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर ' यांची भूमिका साकारत आहे. या नाटकाच्या एका प्रयोगाच्या वेळी त्याचा अभिनय पाहून प्रेक्षक इतके भारावले कि,प्रयोगानंतर प्रेक्षकांनी निखिलला भेटून  अश्रूंना वाट मोकळी करून दिली.या सोबतच या नाटकाने भारावलेल्या एका प्रेक्षकाने या नाटकाचे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर आणि निखिलला आशिर्वाद म्हणून पैशांचे  पाकीट दिले.निखिल ला तर अनुभव अजून एका प्रयोगाला आला एका महिला प्रेक्षकांनी त्याला भेट वस्तू दिली आणि पाकिटात पैसे देखिल दिले निखिलने ते आशिर्वाद आणि प्रेक्षकांचं प्रेम व त्याच्या कामाची पावती समजून स्विकारले.काही सावरकर प्रेमी तर प्रयोगानंतर अक्षरश: निखिलच्या पाया पडतात.प्रेक्षकांच्या या प्रेमाविषयी निखिल सांगतो की, "कोणताही कलाकार हा आपली कलाकृती हि श्रद्धेने,मेहनतीने सादर करीत असतो.रंगभूमीची अगदी मनापासून आणि निष्ठेने सेवा करीत असतो, त्यावेळी रंगभूमीसुद्धा त्याला भरभरून देत असते.प्रेक्षकांच्या या प्रेमामुळे मी भारावून गेलोय,परंतु प्रयोगागणिक मिळणाऱ्या ह्या प्रेमामुळे खूप छान वाटतय.जबाबदारी वाढल्याची जाणीव देखिल होतीये."
  



'चॅलेंज' हे क्रांतिकारकांच्या मैत्रीचे युथफूल नाटक असून या नाटकाचे निर्माते दिनेश पेडणेकर आणि अभिनेत्री मुक्ता बर्वे आहेत. मुक्ताने याआधी ढाई अक्षर प्रेम के, कोडमंत्र यांसारख्या नाटकाची निर्मिती केली आहे.चॅलेंज हे नवे नाटक प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याचे दिनेश पेडणेकर यांनीच सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना सांगितले होते.त्यांनी फेसबुक या सोशल नेटवर्किंग साईटला या नाटकाच्या मुहूर्ताचे फोटो पोस्ट करत त्यासोबतच या नाटकाविषयी माहिती दिली होती.त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले होते.अनामिका निर्मित साईसाक्षी प्रकाशित चॅलेंज या नाटकाचा मुहूर्त दीनानाथ नाट्यगृहाच्या वाचनालयात संपन्न झाला होता. ढाई अक्षर प्रेम के नंतर मी आणि मुक्ता लेखक, दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरचे चॅलेंज हे दुसरे नाटक करत आहे.'चॅलेंज' मध्ये समीर खांडेकर, निखिल राऊत, मंदार कुलकर्णी, दीप्ती लेले, अभिजीत झुंजारराव, ज्ञानेश वाडेकर, शार्दूल आपटे, सुयश पुरोहित आणि स्वतः दिग्पाल लांजेकर महत्वाच्या भूमिकेत आहेत.

Web Title: So Nikhil Raut got the applause of applause

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.