म्हणून सोनाली कुलकर्णीने धारण केली शेरॉन स्टोनची हेअरस्टाईल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2017 04:06 AM2017-10-02T04:06:20+5:302017-10-02T09:38:15+5:30

बॉलिवूड अभिनेत्री किंवा अभिनेता आपल्या भूमिकेसाठी नवनवा लूक धारण करत असतात अगदी शेरॉन स्टोनप्रमाणे हेअरकट धारण करत यापूर्वी अनेक ...

So Sonali Kulkarni holds Sharon Stone's Hairystyle | म्हणून सोनाली कुलकर्णीने धारण केली शेरॉन स्टोनची हेअरस्टाईल

म्हणून सोनाली कुलकर्णीने धारण केली शेरॉन स्टोनची हेअरस्टाईल

googlenewsNext
लिवूड अभिनेत्री किंवा अभिनेता आपल्या भूमिकेसाठी नवनवा लूक धारण करत असतात अगदी शेरॉन स्टोनप्रमाणे हेअरकट धारण करत यापूर्वी अनेक अभिनेत्री हिंदी सिनेमात पाहायला मिळाल्या. आता शेरॉन स्टोनप्रमाणे हेअरकट करत नवीन लूक मिळवण्याचा खास प्रयत्न केला आहे मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने.सोनालीने प्रकाश कुंटे  दिग्दर्शित आगामी "हंपी" या चित्रपटातील भूमिकेसाठी स्पेशल हेअर कट केला आहे. हॉलिवूडस्टार शेरॉन स्टोनप्रमाणे ती आपला हेअरकट  केला असल्याच्या चर्चा रंगत आहेत.शेरॉनप्रमाणे अगदी मिळतीजुळती हेअरस्टाईल सोनालीच्या या फोटोत पाहायला मिळत आहे. अशाप्रकारे हुतूतूमध्ये तब्बूने आणि लक्ष्य सिनेमात प्रिती झिंटाने केस ट्रीम केले होते.तर बेबो म्हणजेच करिना कपूरने 'तलाश' आणि 'ओमकारा' मध्ये असा हेअरकट केल्याचे पाहायला मिळाले होते.तर अनुष्का शर्मानेही आमिर खानच्या पिके सिनेमात अशाप्रकारे हेअरकट केल्याचे पाहायला मिळाले होते.

Also Read:म्हणून सोनाली कुलकर्णीने फॅन्सचे मानले आभार

आता सोनाली कुलकर्णीला हेअरकटमुळे मिळालेल्या नवीन लूकमुळे तिला चांगल्या प्रतिक्रीया मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे.तिच्या या हेअर कटनं तिचा लूकच बदलला आहे. स्वरूप समर्थ एण्टरटेनमेन्टच्या योगेश निवृत्ती भालेराव आणि डिजिटल डिटॉक्स यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून चैतन्य गिरीश अकोलकर यांनी प्रस्तुती केली आहे. चित्रपटाचं लेखन आदिती मोघेनं, दिग्दर्शन प्रकाश कुंटेनं आणि सिनेमॅटोग्राफी अमलेंदू चौधरी यांची आहे. वेगळा लूक मिळाल्यानं सोनालीही खुश होती. 'आजपर्यंत मी कधीच माझे केस इतके शॉर्ट केले नव्हते. त्यामुळे इतके शॉर्ट करावे असं वाटतही नव्हतं. माझ्या या भूमिकेसाठी केस शॉर्ट असावेत, ही प्रकाशचीच आयडिया होती. या भूमिकेत मी आधीपेक्षा वेगळं दिसावं अशी त्याची अपेक्षा होती. माझी भूमिका, ईशा ही टॉम बॉय आहे. तिच्या आनंद शोधण्याची गोष्ट या चित्रपटात आहे. ती शोधत असलेला आनंद तिला हंपीमध्ये सापडतो का, हे चित्रपटात पहायला मिळेल. ही भूमिका साकारता खूप मजा आली,' असं सोनालीनं सांगितलं. सोनालीच्या लुकविषयी प्रकाश म्हणाला, 'सोनालीच्या आजवरच्या भूमिकांचा प्रभाव या भूमिकेवर नको होता. त्यामुळे तिचा लुक बदलणं महत्त्वाचं होतं. तिला 'गर्ल नेक्स्ट डोअर' असा लुक द्यायचा विचार होता. त्यासाठी शॉर्ट केस आणि चष्मा असा लूक समोर आला. सोनालीनंही त्यासाठी तयारी दाखवली आणि आमचं काम सोपं झालं.' या चित्रपटात सोनाली कुलकर्णी सोबत अभिनेत्री प्राजक्ता माळी,अभिनेता प्रियदर्शन जाधव, ललित प्रभाकर अशी उत्तम स्टारकास्ट आहे. येत्या ३ नोव्हेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Web Title: So Sonali Kulkarni holds Sharon Stone's Hairystyle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.