या मराठी चित्रपटात पाहायला मिळणार अजय देवगणच्या दिलवालेतील काही दृश्य

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2017 05:48 AM2017-12-26T05:48:59+5:302017-12-26T11:18:59+5:30

आजवर मराठी चित्रपटात हिंदी चित्रपटातल्या गाण्यांच्या चाली शब्दांचा वापर करण्यात आला आहे. मात्र, नव्वदच्या दशकात गाजलेल्या "दिलवाले" या चित्रपटातील ...

Some scenes from Ajay Devgn's Dilawale will be seen in this Marathi movie | या मराठी चित्रपटात पाहायला मिळणार अजय देवगणच्या दिलवालेतील काही दृश्य

या मराठी चित्रपटात पाहायला मिळणार अजय देवगणच्या दिलवालेतील काही दृश्य

googlenewsNext
वर मराठी चित्रपटात हिंदी चित्रपटातल्या गाण्यांच्या चाली शब्दांचा वापर करण्यात आला आहे. मात्र, नव्वदच्या दशकात गाजलेल्या "दिलवाले" या चित्रपटातील सीन्स रितसर परवानगी घेऊन "चिठ्ठी" या चित्रपटात वापरण्यात आले आहेत. "चिठ्ठी" या  चित्रपटाचा टीजर नुकताच सोशल मीडियात लाँच करण्यात आला असून त्यातून नॉस्टेल्जिक अनुभव मिळत आहे. या चित्रपटातून  अभिनेत्री धनश्री काडगावकर आणि अभिनेता शुभंकर एकबोटे ही नवीन फ्रेश जोडी आपल्या भेटीला येणार आहे.
डांगे एंटरटेन्मेंटच्या विशाल डांगे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून प्रस्तुती ही त्यांनीच केली आहे. वैभव काळुराम डांगे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून स्वरदा बुरसे आणि सुजय जाधव यांनी या चित्रपटाचे लेखन केले आहे. "चिट्ठी" चित्रपटात एक धमाल प्रेमकथा पहायला मिळणार आहे. एका तरूणाने त्याच्या प्रेयसीला पाठवलेली "चिठ्ठी" तिला मिळतच नाही आणि त्यानंतर काय गोंधळ होतो, या आशयसूत्रावर हा चित्रपट बेतला आहे.
नव्वदचे दशक "दिलवाले" या चित्रपटाने गाजवले होते. त्यातले संवाद, गाणी आजही प्रेक्षकांना तोंडपाठ आहेत. आमच्या चित्रपटाच्या कथानकात "दिलवाले"चा महत्त्वपूर्ण संदर्भ आहे. कारण या चित्रपटातील अभिनेत्यावरही या दिलवालेचा प्रभाव पडला आहे. त्यामुळे चित्रपट धमाल झाला आहे. प्रेक्षक ते प्रसंग नक्कीच एन्जॉय  करतील,' असे दिग्दर्शक वैभव डांगे यांनी सांगितले.
"चिठ्ठी" या चित्रपटात अभिनेत्री धनश्री काडगावकर, अभिनेता शुभंकर एकबोटे यांच्यासह अश्विनी गिरी, नागेश भोसले, अक्षय टांकसळे, श्रीकांत यादव, राजेश भोसले आणि काही बालकलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत."चिठ्ठी" हा चित्रपट १९ जानेवारीला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.
दिलवाले या चित्रपटात अजय देवगण, सुनील शेट्टी आणि रवीना टंडन यांच्या मुख्य भूमिका होत्या.  या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती. या चित्रपटाला आज इतकी वर्षं झाली असली तरी या चित्रपटातील सगळीच गाणी आजही हिट आहेत. या चित्रपटातील सुनील, अजय, रवीना या तिघांच्याही अभिनयाचे चांगलेच कौतुक झाले होते. 

Also Read : धनश्री काडगावकरच्या "चिठ्ठी"चा असा झाला घोळ?

Web Title: Some scenes from Ajay Devgn's Dilawale will be seen in this Marathi movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.