कुणी तरी येणार गं..!, गायिका सावनी रवींद्रने शेअर केले बेबी शॉवरचे फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2021 16:43 IST2021-06-11T16:42:24+5:302021-06-11T16:43:09+5:30
गायिका सावनी रवींद्र हिने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली होती.

कुणी तरी येणार गं..!, गायिका सावनी रवींद्रने शेअर केले बेबी शॉवरचे फोटो
मराठी चित्रपटसृष्टीतील गायिका सावनी रवींद्र हिने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली होती. तिने नवरा डॉ. आशिष धांडे यांच्यासोबतचे फोटो शेअर करत लवकरच आई होणार असल्याची खुशखबर दिली होती. त्यानंतर आता तिने बेबी शॉवरचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
सावनी रवींद्र हिने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर बेबी शॉवरचे फोटो शेअर करत म्हटले की, माझ्या प्रिय मैत्रिणींनो तुम्ही मला स्पेशल वाटण्यासाठी जे केले त्यासाठी मी तुमचे आभारी आहे. लव यू. अद्भूत लोकांसोबत अप्रतिम वेळ व्यतित केला.
सावनी रवींद्रने पहिल्यांदा गोड बातमी सांगितली होती. त्यावेळी ती म्हणाली होती की, माझ्या मनात सध्या खूप अलौकीक भावना आहेत. ज्या मी शब्दात व्यक्त करू शकत नाही.
सावनीने आजवर गायिका म्हणून आईपणावर वेगवेगळ्या धाटणीची गाणी गायली आहेत. अंगाईगीत, डोहाळ जेवणाचे गीत, बारश्याची गाणी तिने या आधी गायली होती. मात्र आता मी स्वत: त्या भूमिकेत जाणार आहे. त्यामुळे आईपण अनुभवण्यासाठी ती खूप उत्सुक असल्याचे तिने सांगितले होते.
ती पुढे म्हणाली होती की, मला अस वाटतं की प्रत्येक स्त्री ही नशीबवान असते. कारण ती आई होऊ शकते. आईपण काय असतं हे फक्त एक आईच जाणू शकते आणि सध्या मी मातृत्वाच्या उंबरठ्यावर आहे. आणि या फेजचा मी खूप आनंद घेते आहे.