Video : आशा भोसलेंच्या जुन्या गाण्यावर थिरकली "अप्सरा', 'येऊ कशी प्रिया...' गाण्यावर सोनालीचा भन्नाट डान्स!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2024 10:46 IST2024-06-14T10:44:41+5:302024-06-14T10:46:14+5:30
सोनालीने 'येऊ कशी प्रिया' गाण्यावर भन्नाट डान्स केला आहे.

Video : आशा भोसलेंच्या जुन्या गाण्यावर थिरकली "अप्सरा', 'येऊ कशी प्रिया...' गाण्यावर सोनालीचा भन्नाट डान्स!
मराठी कलाविश्वाची 'अप्सरा' अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (sonalee Kulkarni) ही सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. अभिनेत्रीला तिच्या हटके अदांसाठी ओळखलं जातं. सोनाली दमदार अभिनेत्री तर आहेच परंतु, याशिवाय ती एक उत्तम नृत्यांगणा सुद्धा आहे. सोनाली कुलकर्णीलाआशा भोसलेंच्या 'येऊ कशी प्रिया...' या जुन्या गाण्याची भुरळ पडल्याचं पाहायला मिळालं.
सोनालीने 'येऊ कशी प्रिया' गाण्यावर भन्नाट डान्स केला आहे. याचा व्हिडीओ तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. कॅप्शनमध्ये तिनं लिहलं, 'स्टेजवर सादरीकरण करण्यापूर्वी खुद्द कोरिओग्राफरबरोबर व्हॅनिटी व्हॅनमध्ये डान्स केला'. या व्हिडिओत सोनाली आशा भोसलेंच्या गाण्यावर थिरकताना दिसत आहे. सोनालीने या गाण्याच्या हुक स्टेप्सही केल्या आहेत. विशेष म्हणजे यात गाण्यावर सोनाली एकटी थिरकली नाही. तर तिच्या सोबतीला प्रसिद्ध कोरिओग्राफर आशिष पाटीलने डान्स केला.
सोनाली आणि आशिषच्या हटके स्टाइलने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. हा डान्स व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकरी दोघांवर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. गोल्डन बॉर्डर असलेला काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये सोनाली सुंदर दिसत होती. सोनालीची हटके स्टाइल चाहत्यांना भावली आहे. सोनालीने आजवर अनेक कार्यक्रमांमध्ये लाइव्ह परफॉर्मन्स केले आहेत. तिच्या डान्सची चर्चा नेहमीच होत असते.
आजवर अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये सोनालीने काम केलं आहे. 'नटरंग', 'हिरकणी', 'मितवा' अशा गाजलेल्या सिनेमांमध्ये झळकलेल्या सोनालीने नुकतेच मल्याळम सिनेमातही एन्ट्री केली आहे. तिने 'मलाइकोट्टई वालीबान' या चित्रपटात सुपरस्टार मोहनलाल यांच्याबरोबर स्क्रीन शेअर केली. याशिवाय लवकरच सोनाली मोठ्या पडद्यावर 'मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी' यांच्या भूमिकेत झळकणार आहे. सोनाली तिच्या प्रोफेशनल लाइफसोबतच पर्सनल आयुष्यामुळेही चर्चेत येत असते. सोनालीने कुणाल बेनोडेकर याच्यासोबत लग्नगाठ बांधली आहे.