सोनाली कुलकर्णी लवकरच रसिकांच्या भेटीला, जाणून घ्या कोणते कोणते सिनेमा होणार प्रदर्शित
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2021 02:53 PM2021-07-05T14:53:55+5:302021-07-05T14:58:38+5:30
सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर सध्या बरीच अॅक्टिव्ह असते. इथं ती आपल्या फॅन्सशी संवाद साधत असते. शिवाय सोशल मीडियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडिओसुद्धा शेअर करत असते.
रसिकांची लाडकी अप्सरा म्हणजेच सोनाली कुलकर्णी. विविध सिनेमात सोनालीनं वैविध्यपूर्ण भूमिका साकारत रसिकांची मनं जिंकली आहेत. नुकतेच कुणाल बेनोडेकरसह लग्नबंधनात अडकली आहे. सध्या ती खासगी आयुष्य एन्जॉय करते. सोनाली सोशल मीडियावर सध्या बरीच अॅक्टिव्ह असते. इथं ती आपल्या फॅन्सशी संवाद साधत असते. शिवाय सोशल मीडियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडिओसुद्धा शेअर करत असते. तिच्याविषयीची प्रत्येक घडामोडी जाणून घेण्यात रसिकांना रस असतो. लवकरच सोनाली रसिकांच्या भेटीला येण्सासाठी सज्ज आहे. आगामी काळात वेगवेगळ्या सिनेमातून रसिकांचे ती मनोरंजन करताना दिसणार आहे.
छत्रपती ताराराणींचे प्रेरणादायी आयुष्य आणि तडफदार व्यक्तिमत्व पडद्यावर साकारण्याचे भाग्य लाभणे म्हणजे एका कलाकारासाठी किंबहुना एका मराठी मुलीसाठी तिच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी अभिमानाची गोष्ट आहे. त्याच बरोबरीने आजवर ज्या रणरागिणीविषयी कुठल्याही चलचित्र माध्यमात वाच्यता झालेली नाही तिच्या कर्तृत्वाचे पोवाडे गाणे हे अत्यंत आव्हानातमक काम असेल, त्यामुळे ही भूमिका मला खूपच जबाबदारीने पार पाडायची आहे. त्यासाठी श्रींचा आणि महाराजांचा आशिर्वाद आम्हाला लाभो, आई भवानीने आमच्या मनगटात ही कामगिरी पार पाडण्याचे बळ द्यावे, हीच प्रार्थना असे सोनाली कुलकर्णीने सांगितले होते.
आगामी काळात 'फ्रेश लाईम सोडा' सिनेमात सोनालीसह प्रार्थना बेहरेही झळकणार आहे. तर 'झिम्मा' सिनेमात निर्मिती सावंत, सुहास जोशी, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सोनाली कुलकर्णी, सायली संजीव, मृण्मयी गोडबोले यांच्यासोबत सिद्धार्थ चांदेकर दिग्गज कलाकारांची फौज रसिकांचे भरघोस मनोरंजन करताना दिसतली. त्यामुळे रुपेरी पडद्यावर सोनाली कधी झळकणार असा प्रश्न पडणा-या चाहत्यांसाठी नक्कीच आनंदाची बातमी असणार हे मात्र नक्की.