पाठमोरा फोटो शेअर केल्यानंतर सोनाली कुलकर्णीने शेअर केला असा फोटो, पाहणारेही पाहतच राहिले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2021 11:43 AM2021-10-08T11:43:36+5:302021-10-08T11:53:55+5:30

sonalee kulkarni glamorous bikini photos गेल्या काही दिवसांत तिच्या ट्रीपचे बरेच फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. या फोटोंवर चाहत्यांनी भरभरुन प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Sonalee Kulkarni Share Red Bikini Photo set the temperature soaring with her latest pictures | पाठमोरा फोटो शेअर केल्यानंतर सोनाली कुलकर्णीने शेअर केला असा फोटो, पाहणारेही पाहतच राहिले

पाठमोरा फोटो शेअर केल्यानंतर सोनाली कुलकर्णीने शेअर केला असा फोटो, पाहणारेही पाहतच राहिले

googlenewsNext

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी लग्नानंतर प्रचंड चर्चेत असते. सोशल मीडियावर तिचा प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे. आपले फोटो व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या सपंर्कात ती असते. पती कुणाल बेनोडेकरसोबत  वेगवेगळ्या ठिकाणांना भेट देत व्हॅकेशन एन्जॉय करताना दिसते. अभिनयासोबतच तिला भटकंतीची फार आवड आहे. लग्नाआधीसुद्धा शूटिंगच्या व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढून ती आवर्जून वेगवेगळ्या ठिकाणांना भेट देताना दिसायची. लग्नानंतरही तिने तिची आवड जोपासली असल्याचे दिसतंय.

 

गेल्या काही दिवसांपासून तिने तिच्या ट्रीपचे बरेच फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. या फोटोंवर चाहत्यांनी भरभरुन प्रतिक्रिया दिल्या आहेत. व्हॅकेशन दरम्यान तिच्या लूकवरही चाहते फिदा आहेत. सोशल मीडियावर तिच्या व्हॅकेशनदरम्यानचे फोटो व्हिडीओ शेअर करत चाहत्यांचीही वाहवा मिळवताना दिसते. तिच्या मालदीव्हज टुरच्याही फोटोंना प्रचंड पसंती मिळाली होती. आता सोनाली कुलकर्णी सिचेल या ठिकाणी निवांत वेळ घालवतानाचे फोटो शेअर केले आहेत. 

सिचेलमधील सुमद्राकाठी एन्जॉय करत असल्याचे तिचे फोटो समोर  येताच चाहत्यांच्या नजरा तिच्या या फोटोंवरच खिळल्या आहेत.  यात बिकीनीमध्ये तिने काही फोटो शेअर केले आहेत. एक पाठमोरा बॅकलेस फोटो तिने शेअर केला. पाठमोरा फोटो पाहून चाहत्यांनी तिला चेहरा दिसेल असा फोटो शेअर करण्याची मागणी केली.

चाहत्यांनाही सोनालीने निराश केले नाही. लाल रंगाच्या बिकीनीतला चेहरा दिसेल असा फोटो तिने शेअर केला. हा फोटो पाहून चाहते फुल ऑन फिदा होत असल्याचे पाहायला मिळत आहे. सोनालीने सिचेल व्हॅकेशनदरम्यानचे  हे फोटो शेअर करताच अवघ्या काही वेळातच त्यावर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव सुरू झाला आहे. 

सोनालीने पोस्ट केलेले फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. बिकीनी फोटोमुळे  नेटकऱ्यांना घायाळ करत आहे. सिचेल निसर्गरम्य बेटावर सुट्ट्यांचा आनंद घेतानाचे फोटो तुम्हाला क्लीन बोल्ड करतील. विशेष म्हणजे बिकीनीमधील सोनालीच्या अदा कुणालाही वेड लावतील अशाच आहेत.
 

Web Title: Sonalee Kulkarni Share Red Bikini Photo set the temperature soaring with her latest pictures

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.