Video रसिकांची लाडकी ‘अप्सरा बनली कळसूत्री बाहुली’, सोनालीच्या कठपुतली का खेल व्हिडीओवर रसिकांकडून लाइक्सचा वर्षाव
By सुवर्णा जैन | Updated: November 28, 2018 14:44 IST2018-11-28T14:40:50+5:302018-11-28T14:44:38+5:30
या व्हीडीओत सोनाली कुलकर्णी कळसूत्री बाहुलीप्रमाणे नृत्य करत असल्याचे पाहायला मिळत आहे. या व्हिडीओला सोनालीने ''कठपुतली का खेल'' अशी कॅप्शनही दिली आहे.

Video रसिकांची लाडकी ‘अप्सरा बनली कळसूत्री बाहुली’, सोनालीच्या कठपुतली का खेल व्हिडीओवर रसिकांकडून लाइक्सचा वर्षाव
मराठमोळी अभिनेत्री आणि रसिकांची लाडकी अप्सरा म्हणजेच सोनाली कुलकर्णी. विविध सिनेमात सोनालीनं वैविध्यपूर्ण भूमिका साकारत रसिकांची मनं जिंकली आहेत. सोनाली सोशल मीडियावर सध्या बरीच अॅक्टिव्ह असते. इथं ती आपल्या फॅन्सशी संवाद साधत असते. शिवाय सोशल मीडियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडीओसुद्धा शेअर करत असते. तिने नुकताच सोशल मीडियावर शेअर केलेला एक व्हिडीओ तुम्हालाही नक्कीच वेड लावल्याशिवाय राहणार नाही. या व्हिडीओमध्ये सोनाली कठपुतली म्हणजेच कळसूत्री बाहुलीप्रमाणे नटली आहे. इतकंच नाही तर ती कळसूत्री बाहुलीप्रमाणे नृत्य करत असल्याचे पाहायला मिळत आहे. या व्हिडीओला सोनालीने ''कठपुतली का खेल'' अशी कॅप्शनही दिली आहे.
व्हिडीओत दिसणारी ही सोनालीच आहे की सोनालीसारखी हुबेहूब दिसणारी कळसूत्री बाहुली आहे असा प्रश्न तिच्या फॅन्सना पडला आहे. सोनालीच्या या कळसूत्री बाहुली व्हिडीओला सोशल मीडियावर बरीच पसंती मिळत आहे. फॅन्सकडून या व्हिडीओवर कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव होत आहे. सोनालीचे ट्विटर अकाऊंट व्हेरिफाइड असून तिला ट्विटरवर फॉलो करणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे.ट्विटर या सोशल नेटवर्किंग साइटमुळेच ती सध्या प्रचंड खूश आहे. कारण ट्विटवरवर तिच्या फॉलोव्हर्सची संख्या आता एक लाख तेहतीस हजाराहून अधिक झाली आहे. तिच्या ट्विटर फॉलोव्हर्सचा आकडा लाखाहून अधिक झाल्याचा आनंद तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केला आहे. तिने ट्विटरवर तिचा एक खूप छानसा फोटो पोस्ट करून आईला इट्स १०० के असे लिहिले आहे.
सोनाली कुलकर्णीने आज तिच्या मेहनतीने मराठी चित्रपटसृष्टीत तिचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.तिने बकुळा नामदेव घोटाळे या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते.तिने मराठीत एकाहून एक हिट चित्रपट दिले असून हिंदी चित्रपटातही तिने काम केले आहे. नटरंग या चित्रपटातील अप्सरा आली हे तिचे गाणे प्रचंड गाजले होते. या चित्रपटानंतर तिला मराठी चित्रपटसृष्टीतील अप्सराच म्हटले जाते. तिने 'अंजिठा', 'पोस्टर गर्ल', 'झपाटलेला २', 'मितवा', 'क्लासमेट' यांसारख्या चित्रपटांमध्ये दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत.