युरोपमध्ये पतीसह व्हॅकेशन एन्जॉय करतेय सोनाली खरे, फोटो व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2023 19:44 IST2023-08-08T19:42:22+5:302023-08-08T19:44:39+5:30
मराठी कलाविश्वातील एव्हरग्रीन अभिनेत्री सोनाली खरे सध्या विदेश दौऱ्यावर आहे.

युरोपमध्ये पतीसह व्हॅकेशन एन्जॉय करतेय सोनाली खरे, फोटो व्हायरल
भटकंती कुणाला नाही आवडत... आपल्यापैकी प्रत्येकालाच फिरायला आवडतं. आपल्या आजूबाजूच्याच नाही तर देश आणि जगातील विविध पर्यटनस्थळांना भेट द्यायला प्रत्येकालाच आवडतं. या पर्यटनस्थळी निवांत क्षण घालवणं प्रत्येकालाच भावतं. विविध पर्यटनस्थळांची सफारी आपऊल्यापैकी प्रत्येकालाच आवडते. सर्वसामान्यांप्रमाणे सेलिब्रिटीसुद्धा त्यांच्या शुटिंगच्या निमित्ताने किंवा कामातून ब्रेक घेऊन आपल्या कुटुंबासोबत फिरत असतात. सोशल मीडियावर त्यांचे फोटो शेअर करत असतात.
मराठी कलाविश्वातील एव्हरग्रीन अभिनेत्री म्हणजे सोनाली खरे (sonali khare). सध्या सोनाली विदेश दौऱ्यावर आहे. येथील अनेक फोटो, तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सोनाली सध्या तिच्या कुटुंबासोबत क्वालिटी टाइम घालवत आहे. त्यामुळे ती तिच्या नवऱ्यासह प्रागला गेली आहे. सध्या हे कुटुंब युरोपमध्ये फिरण्याचा मनमुराद आनंद लुटत आहेत.
दरम्यान एका मुलीची आई असलेली सोनाली आजही फिट आणि सुंदर दिसते त्यामुळे नेटकऱ्यांमध्ये तिची कायम चर्चा रंगत असते. उत्तम अभिनयासह सोनाली तिच्या फिटनेसमुळेही कायम चर्चेत असते.. सोनाली मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे. तसंच काही रिअॅलिटी शोमध्येही ती झळकली आहे. सोनालीचा पूर्वीपेक्षा आता कलाविश्वातील वावर कमी झाला आहे. मात्र, ती सोशल मीडियावर कायम सक्रीय असल्याचं पाहायला मिळतं. सोनालीने निर्मिती श्रेत्रात काही दिवसांपूर्वी पदार्पण केलं आहे.