लॉकडाऊनमध्ये ही मराठी अभिनेत्री देतेय योगाचे धडे, सेलिब्रेटीही करतायेत तिच्या फोटोवर कमेंट्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2020 13:59 IST2020-04-20T13:11:33+5:302020-04-20T13:59:59+5:30
मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली खरे हिने चित्रपट, मालिका व नाटक अशा तिन्ही माध्यमातून रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं आहे.

लॉकडाऊनमध्ये ही मराठी अभिनेत्री देतेय योगाचे धडे, सेलिब्रेटीही करतायेत तिच्या फोटोवर कमेंट्स
मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली खरे हिने चित्रपट, मालिका व नाटक अशा तिन्ही माध्यमातून रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं आहे. सोनाली तिच्या आगामी प्रोजेक्ट्स व सोशल मीडियावरील फोटोंमुळे चर्चेत येत असते. लॉकडाऊनच्या काळात अनेक सेलिब्रेटी योगासन करतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करतायेत. अभिनेत्री सोनालीने ही तिच्या इन्स्टाग्रामवर शीर्षासन करतानाचा फोटो शेअर केला आहे. सोनालीच्या या फोटोला फॅन्सनी लाईक्स आणि कमेंट्स केल्या आहेत. सोनाली अनेकवेळा योगासन करतेवेळीच फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
सोनानी काही महिन्यांपूर्वी तिचे WOW नावाचं युट्यूब चॅनेल सुरु केले आहे. या चॅनेलच्या माध्यमातून ती हेल्थ, वेलनेस व फिटनेसशी निगडीत सल्ले प्रेक्षकांना देत असते.
सोनाली शेवटची हृद्यांतर चित्रपटात झळकली. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आता ती बाहुबली चित्रपटावर आधारीत वेबसीरिजमध्ये दिसणार आहे. या सीरिजमध्ये काम करण्यासाठी ती खूपच उत्सुक आहे. यात ती पारंपारिक वेशात दिसणार आहे.