सोनाली खरे WOW मुळे आलीय चर्चेत, अन् सगळे सेलिब्रेटीदेखील करताहेत WOW
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2019 15:25 IST2019-10-17T15:24:51+5:302019-10-17T15:25:12+5:30
सोनाली खरे सोशल मी़डियावर एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे.

सोनाली खरे WOW मुळे आलीय चर्चेत, अन् सगळे सेलिब्रेटीदेखील करताहेत WOW
मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली खरे हिने चित्रपट, मालिका व नाटक अशा तिन्ही माध्यमातून रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं आहे. सोनाली तिच्या आगामी प्रोजेक्ट्स व सोशल मीडियावरील फोटोंमुळे चर्चेत येत असते. मात्र यावेळेस ती एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. हे कारण म्हणजे WOW.
सोनाली खरे हिने सोशल मीडियावर WOW या लोगोसोबत फोटो शेअर करत तिने वॉव काय आहे? ओळखा पाहू ? असं कॅप्शन दिलं आहे.
सोनालीचे WOW हे काय आहे, हा प्रश्न सगळ्यांनाच भेडसावत आहे. कुणाला वाटतंय की ती रेसिपी सांगणार आहे तर कुणाला वाटतंय की कोणत्या प्रोडक्टचं ब्रॅण्डिंग करणार आहे. तर कुणी म्हणतंय आठवड्याला वर्कआऊट करून दाखवणार आहे. मात्र नेमकं काय, याचं उत्तर आपल्याला सोनालीच देऊ शकते. इतकंच नाही तर चित्रपटसृष्टीतील तिचे मित्रमंडळी त्यांची वॉव मोमेंट सांगत सोशल मी़डियावर तिला शुभेच्छा देताना दिसत आहेत.
आता सोनाली WOW बद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच आतुरतेनं वाट पाहत आहेत.
सोनाली शेवटची हृद्यांतर चित्रपटात झळकली. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आता ती बाहुबली चित्रपटावर आधारीत वेबसीरिजमध्ये दिसणार आहे. या सीरिजमध्ये काम करण्यासाठी ती खूपच उत्सुक आहे. यात ती पारंपारिक वेशात दिसणार आहे.
बाहुबली सीरिजबद्दल सोनाली खरेने सांगितले की, आता माझ्या भूमिकेबद्दल सांगणं उचित ठरणार नाही. या सीरिजमध्ये मी भारतीय स्त्रीच्या भूमिकेत पहायला मिळणार आहे. अशी भूमिका साकारायला मिळाल्यामुळे मी खूप खूश आहे. अशा प्रकारचा लूक असलेली भूमिका मला बऱ्याच वर्षानं करण्याची संधी मिळाली आहे.