सोनाली कुलकर्णीने खरेदी केली नवी कोरी मर्सिडीज बेंझ, लक्झरी कारची किंमत माहितीये का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 08:50 IST2025-01-02T08:50:29+5:302025-01-02T08:50:45+5:30
सोनालीने वर्षाअखेरीस महागडी कार घरी आणली. मर्सिडीज बेंझ ही लक्झरी कार सोनालीने खरेदी केली आहे.

सोनाली कुलकर्णीने खरेदी केली नवी कोरी मर्सिडीज बेंझ, लक्झरी कारची किंमत माहितीये का?
सोनाली कुलकर्णी ही लोकप्रिय अभिनेत्री आहे. मराठी सिनेसृष्टीत अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या सोनालीने बॉलिवूडमध्येही नाव कमावलं आहे. अनेक सुपरहिट बॉलिवूड सिनेमांमध्ये तिने काम केलं आहे. सोनालीचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. सोनालीने नुकतीच नवी कोरी कार खरेदी केली आहे.
२०२४ हे वर्ष संपून नव्या वर्षाला सुरुवात झाली आहे. मोठ्या जल्लोषात २०२५चं स्वागत सगळ्यांनी केलं आहे. सरत्या वर्षाला निरोप देताना २०२४चा शेवट सोनालीने गोड केला आहे. सोनालीने वर्षाअखेरीस महागडी कार घरी आणली. मर्सिडीज बेंझ ही लक्झरी कार सोनालीने खरेदी केली आहे. सोनालीने खरेदी केलेल्या या लक्झरी कारची किंमत तब्बल ७० ते ७५ लाखांच्या घरात आहे. मर्सिडीज बेंझच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन सोनालीचे फोटो शेअर करण्यात आले आहेत. कुटुंबीयांसह सोनाली ही कार खरेदी करण्यासाठी गेली होती.
सोनालीने तिच्या नव्या गाडीसह फोटोसाठी खास पोझही दिल्या आहेत. सोनालीच्या या फोटोंवर चाहत्यांनी आणि सेलिब्रिटींनीही कमेंट करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत. सोनाली अलिकडेच प्रदर्शित झालेल्या मानवत मर्डर्स या वेब सीरिजमध्ये झळकली होती. सत्य घटनेवर आधारित असलेली ही वेब सीरिज प्रचंड गाजली.