independence Day : सोनाली कुलकर्णींने दिल्या स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा, म्हणाली-अभिमान वाटतोय..
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2022 11:01 IST2022-08-15T10:38:16+5:302022-08-15T11:01:24+5:30
Independence Day: संपूर्ण देशभरात भारताच्या स्वातंत्र्याचा ७५ व्या अमृत महोत्सव जल्लोषात साजरा केला जात आहे.

independence Day : सोनाली कुलकर्णींने दिल्या स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा, म्हणाली-अभिमान वाटतोय..
संपूर्ण देशभरात भारताच्या स्वातंत्र्याचा ७५ व्या अमृत महोत्सव जल्लोषात साजरा केला जात आहे. तिरंगा भारताच्या कानाकोपऱ्यातच नाही, तर जगाच्या कानाकोपऱ्यात हा तिरंगा अभिमानाने फडकत असल्याचे पाहिले मिळतंय. सर्वसामान्यपासून ते सेलिब्रेटींपर्यंत प्रत्येकजण आज देशाचा ७५वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजर करतो. अभिनेत्री सोनाली कुलकर्णींने अमेरिकेत स्वातंत्र्यदिन साजरा केला आहे. सोशल मीडियावर तिने या दरम्यानचे फोटो शेअर करत देशवासियांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सोनाली बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनाच्या निमित्ताने अमेरिकेला गेली आहे.
अमेरिकेत लैहराया परचम… 🇮🇳 बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनाच्या निमित्ताने साधारण ५००० मराठी माणसां सोबत, विदेशात आपली संस्कृती, कला, भाषा, विचारांची देवाण घेवाण करताना, हे सगळं साजरा करताना खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष साजरा केला असंच वाटतंय. या विलक्षण अनुभवाबद्दल अभिमान वाटतोय 🙏🏻 सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
गेले काही दिवस देशाच्या कानाकोपऱ्यात तिरंग्याचे वाटप सुरू होते. हे तमाम राष्ट्रध्वज आता घराघरांवर डौलाने फडकत आहेत आणि या उत्सवी सोहळ्यातून देशभक्तीचे एक दिमाखदार वातावरण नक्कीच निर्माण झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करण्यात आले. लाल किल्ल्यावर नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवव्यांदा ध्वजारोहण करण्यात आले आहे.