सोनाली कुलकर्णीचा नीता अंबानींसोबत सेल्फी, गुलाबी साडीत रिसेप्शनला लावली हजेरी; म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2024 10:20 AM2024-07-16T10:20:42+5:302024-07-16T10:21:59+5:30

अंबानींच्या रिसेप्शन पार्टीत कोणकोणत्या मराठी कलाकारांनी लावली हजेरी?

Sonali Kulkarni shares selfie with Nita Ambani attends reception wore pink saree | सोनाली कुलकर्णीचा नीता अंबानींसोबत सेल्फी, गुलाबी साडीत रिसेप्शनला लावली हजेरी; म्हणाली...

सोनाली कुलकर्णीचा नीता अंबानींसोबत सेल्फी, गुलाबी साडीत रिसेप्शनला लावली हजेरी; म्हणाली...

आशियातील सर्वात श्रीमंत अंबानी कुटुंबातील अनंत-राधिकाचा १२ जुलै रोजी विवाहसोहळा पार पडला. १४ जुलै मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बॉलिवूड कलाकारांसह काही मराठी कलाकारांनीही हजेरी लावली होती. अमृता खानविलकर आणि गिरीजा ओक यांचा रेड कार्पेट लूक व्हायरल झाला होता. याशिवाय अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनेही (Sonali Kulkarni) रिसेप्शनला हजेरी लावली होती. इतकंच नाही तर सोनालीने नीता अंबानींसोबत सेल्फीही घेतला.

अनंत आणि राधिकाच्या रिसेप्शन पार्टीत मराठमोळ्या सोनाली कुलकर्णीने सुंदर लूकमध्ये हजेरी लावली. गुलाबी शिमरी साडी, सुंदर नेकलेस आणि टू द पॉइंट मेकअप अशा लूकमध्ये तिने आपले फोटो पोस्ट केलेत. यात ती खूप सुंदर दिसत आहे. 'starry starry night' असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे.

याशिवाय सोनालीने नीता अंबानींसोबत सेल्फीही घेतला. इन्स्टाग्राम स्टोरीवर तिने सेल्फी शेअर केला आहे. यासोबत तिने लिहिले, 'Beautiful Ceremony..! God Bless You All!" 

सोनालीच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट करत प्रेमाचा वर्षाव केला आहे. अंबानींच्या रिसेप्शन पार्टीत अमृता खानविलकर, गिरीजा ओक, गायिका प्रियंका बर्वे, अनुषा दांडेकरसह काही मराठी इन्फ्लुएन्सर्सनेही हजेरी लावली होती. तर अभिनेता शरद केळकरने रिसेप्शनमध्ये होस्टची भूमिका पार पाडली. 

Web Title: Sonali Kulkarni shares selfie with Nita Ambani attends reception wore pink saree

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.