मुंबईतून मराठी माणूस कमी होतोय? सोनाली कुलकर्णी नेमकं काय म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2024 03:23 PM2024-08-28T15:23:22+5:302024-08-28T15:24:26+5:30

मुंबईत दरवर्षीच मोठ्या उत्साहात दहीहंडी उत्सव साजरा केला जातो. यंदाही मुंबईत ठिकठिकाणी दहीहंडी उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं.

Sonali Kulkarni talk about Marathi People Are Decreasing In Mumbai At Dahi Handi | मुंबईतून मराठी माणूस कमी होतोय? सोनाली कुलकर्णी नेमकं काय म्हणाली...

मुंबईतून मराठी माणूस कमी होतोय? सोनाली कुलकर्णी नेमकं काय म्हणाली...

Sonali Kulkarni  :  देशात सोमवारी जन्माष्ठमी आणि मंगळवारी दही हांडी उत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला. मुंबईत दरवर्षीच मोठ्या उत्साहात दहीहंडी उत्सव साजरा केला जातो. यंदाही मुंबईत (Mumbai Dahi Handi) ठिकठिकाणी दहीहंडी उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. दहीहंडी उत्सवाला मराठी सेलिब्रेटींनी हजेरी लावून गोविंद पथकांचा उत्साह वाढवला. घाटकोपर आणि लालबागमधील दहीहंडीला अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनेही (Sonali Kulkarni at Dahi Handi Mumbai ) हजेरी लवली होती.  यावेळी माध्यमांशी बोलताना सोनालीने आनंद व्यक्त केला.

सोनाली म्हणाली, "उत्साह आपल्या सर्वांना दिसतोय किती छान आहे. मला वाटतं की आपण वर्षभर वाट बघतो. दहीहंडी हा आपल्या सर्वांचा लाडका, महाराष्ट्रांच्या मनातला हा  उत्सव आहे. मुंबईत एवढ्या भव्यदिव्य स्वरुपात दहीहंडी साजरी होते. ही मराठमोळी दहीहंडी आठवणीत राहिलं". 

सोनाली म्हणते "मराठी माणसांना एकत्र पाहून आनंद होतोय. गोविंद पथकांचा उत्साह वाढवण्यासाठी मराठी कलाकारांना बोलवण्यात आलं. त्यामुळे मराठी माणसांना हक्काचं व्यासपीठ मिळालं आहे. आपल्या मुंबईमध्येगोविंद पथकांना हक्काचा उत्सव साजरा करता येतोय . आपल्याला कायम वाटतं मुंबईतून मराठी माणसं ही संपत चालली आहेत का? पण अशा वेळी मराठी माणस एकत्र येतात. महाराष्ट्राच्या मानाच उत्सव मराठमोळ्या पद्धतीने साजरा व्हावा असा अट्टहास पाहून तर गहिवरुन येतय. खूप छान वाटतंय". 


पुढे सोनाली म्हणाली, "आपली संस्कृती टिकवायची असेल आपले सर्वंच उत्सव अशाच पद्धतीने साजरे करायला हवेत. त्यामुळे मराठी माणसांनी एकत्र येऊन आपली मराठी संस्कृती जपली तरच ती पुढच्या पिढीपर्यंत पोहचेल". महिलांवरील अत्याचारांबाबत विचारल्यावर सोनाली म्हणाली, "प्रचंड राग आहे. मनस्ताप आहे.  फक्त महाराष्ट्रात नाही, तर देशभरात सारखीच परिस्थिती आहे. देशभरातले कायदे कठोर होत नाहीत, तोपर्यंत कुठल्याही राज्यात वेगळी क्रांती घडणार नाही. प्रत्येक राज्यात आणि देशात बदल घडायला हवा असेल तर न्याय मिळण्याची प्रक्रिया ही त्वरित व्हायला हवी. अशा गुन्ह्यांची शिक्षा ही कठोर असू शकते, याबाबत जोपर्यंत  गांभीर्य जाणवणार नाही. जोपर्यंत बदलवरुन घडत नाही, तोपर्यंत काहीही परिणाम पाहण्यास मिळणार नाही".

Web Title: Sonali Kulkarni talk about Marathi People Are Decreasing In Mumbai At Dahi Handi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.