सोनाली कुलकर्णी दिसणार छोट्या पडद्यावर, ‘क्राइम पेट्रोल’चे करणार सूत्रसंचालन
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2021 17:23 IST2021-04-05T17:23:01+5:302021-04-05T17:23:27+5:30
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी क्राइम पेट्रोल सतर्क या आगळ्या वेगळ्या सीरीजचे सूत्रसंचालन करताना दिसणार आहे.

सोनाली कुलकर्णी दिसणार छोट्या पडद्यावर, ‘क्राइम पेट्रोल’चे करणार सूत्रसंचालन
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने आतापर्यंत अनेक हिंदी व मराठी चित्रपटात महत्त्वाची भूमिका केली आहे. आता ती क्राइम पेट्रोल सतर्क या आगळ्या वेगळ्या सीरीजचे सूत्रसंचालन करणार आहे. जस्टिस रिलोडेड नावाच्या या आवृत्तीत व्यापक आणि गंभीर गुन्ह्याचे नाट्यमय सादरीकरण केले असून विविध आव्हानांमुळे त्यात रहस्य निर्माण होते. अखेरीस एका नव्या दृष्टीकोनातून त्याकडे पाहावे लागते.
होस्ट म्हणून, सोनाली कुलकर्णी या भागात सतर्कतेचे इशारे आणि विचार प्रक्रियेत आवश्यक असलेल्या फेरबदलांबद्दल सांगणार आहे. हे कठीण असून विचार करण्यास प्रवृत्त करते. एखाद्या गुन्ह्याविरोधात तक्रार दाखल करणे किती महत्त्वाचे असते, याबाबतही ती जागृती करताना दिसेल.
या नव्या भूमिकेबद्दल सोनाली कुलकर्णी म्हणाली, “मी नुकतेच ‘क्राइम पेट्रोल’च्या टीमसोबत काम सुरु केले आहे. टीम खूप अप्रतिम आहे. अशा उत्साही आणि परिपूर्ण टीमसोबत काम करताना परफॉर्मरची उंची वाढते. माझ्यासाठी क्राइम पेट्रोल हा एक बॅटरीसारखा आहे. तो सर्वांना जागृत करण्याचा प्रयत्न करतो. लोकांनी अशा प्रकारच्या सापळ्यात अडकण्याऐवजी काय करावे, याबद्दल जबाबदार असले पाहिजे, यासाठी लोकांना सतर्क करण्याचे काम मी करणार आहे. चला सजग आणि जबाबदार बनूया.”
क्राइम पेट्रोल सतर्क: जस्टिस रिलोडेड, ५ एप्रिलपासून सुरुवात, रात्री ११ वाजता, फक्त सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवर पहायला मिळेल.