नवऱ्याबद्दल चाहत्याच्या ‘त्या’ कमेंटवर सोनाली कुलकर्णीने दिलं सडेतोड उत्तर; म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2023 16:28 IST2023-12-31T16:26:19+5:302023-12-31T16:28:29+5:30
सोनाली सध्या बालीमध्ये असून व्हॅकेशन एन्जॉय करत आहे.

नवऱ्याबद्दल चाहत्याच्या ‘त्या’ कमेंटवर सोनाली कुलकर्णीने दिलं सडेतोड उत्तर; म्हणाली...
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर फार सक्रिय असते. नेहमी फोटो, व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असते. या पलीकडे ती सोशल मीडियाद्वारे आपली परखड मत देखील व्यक्त करत असते. शिवाय सोनाली पोस्टवर येणाऱ्या प्रतिक्रिया किंवा ट्रोल करणाऱ्यांना प्रत्युत्तर देत असते. नुकतंच तिने एका चाहत्याने केलेल्या खोचक कमेंटवर तिने चोख उत्तर दिलं आहे.
सोनाली सध्या बालीमध्ये असून व्हॅकेशन एन्जॉय करत आहे. या ट्रीपचे काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले. यावर पूनम पाटील पांडव नावाच्या युजरने "बिचारा नवरा एकही फोटो नाही त्याचा',अशी कमेंट करुन ट्रोल केलं. या कमेंटला सोनालीनं रिप्लाय दिला आहे. ती म्हणाली,'त्याची मर्जी, तुम्हाला का त्रास होतोय एवढा?'. सोनालीच्या या रिप्लायनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
सोनालीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, मराठमोळी अप्सरा लवकरच दाक्षिणात्य सुपरस्टार मोहनलाल यांच्यासोबत ‘मलाइकोट्टई वालीबान’ या सिनेमात झळकणार आहे. सोनालीनं आतापर्यंत अनेक सिनेमांत काम केलं आहे. त्यात गाढवाचं लग्न, गोष्ट लग्नाची, नटरंग, अजिंठा, झपाटलेला २, रमा माधव, क्लासमेट्स, मितवा, ,पोश्टर गर्ल, बघतोस काय मुजरा कर, हिरकणी, अशा अनेक सिनेमांचा समावेश आहे. तिच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहतात. अभिनयाबरोबच सोनाली उद्योजिका देखील झाली आहे.