लंडनमध्ये शूट करत असलेल्या सोनाली कुलकर्णीच्या सिनेमाचे नाव आले समोर, ती म्हणतेय - थ्री चिअर्स टू अस..!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2020 12:37 PM2020-11-27T12:37:23+5:302020-11-27T12:38:13+5:30

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या लंडनमध्ये असून ती आगामी चित्रपटाचे शूटिंग करत आहे

Sonali Kulkarni's movie name out which is shooting in London, saying - Three cheers to us ..! | लंडनमध्ये शूट करत असलेल्या सोनाली कुलकर्णीच्या सिनेमाचे नाव आले समोर, ती म्हणतेय - थ्री चिअर्स टू अस..!

लंडनमध्ये शूट करत असलेल्या सोनाली कुलकर्णीच्या सिनेमाचे नाव आले समोर, ती म्हणतेय - थ्री चिअर्स टू अस..!

googlenewsNext

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या लंडनमध्ये असून ती आगामी चित्रपटाचे शूटिंग करत आहे. ही माहिती खुद्द तिनेच सोशल मीडियावर दिली. या चित्रपटात तिच्यासोबत हेमंत ढोमे मुख्य भूमिकेत आहे. सोनालीने नुकत्याच शेअर केलेल्या पोस्टमधून या चित्रपटाचे नाव समोर आले आहे. सोनाली लंडनमध्ये शूट करत असलेल्या चित्रपटाचे नाव डेट भेट असे आहे. 


सोनाली कुलकर्णीने एक व्हिडीओ शेअर करत म्हटले की, थ्री चिअर्स टू अस. लंडनमधील माझा तिसरा सिनेमा, माझी आणि हेमंत ढोमेचा हा तिसरा सिनेमा आहे आणि लोकेश गुप्तेचा दिग्दर्शन असलेला हा तिसरा चित्रपट आहे. 


यापूर्वी सोनाली कुलकर्णीने इंस्टाग्रामवर चित्रपटाच्या सेटवरील फोटो शेअर करत सांगितले होते की, कोव्हिडच्या लॉकडाउननंतर पहिलाच चित्रपट शूट करते आहे. माझी तर २०२०मधील पहिली फिल्म आहे आणि वर्ष संपण्याआधी ही संधी मिळाली. लोकेश विजय गुप्ते या एका अत्यंत हुशार नटाच्या दिग्दर्शनाखाली..माझा आवडता सहकलाकार हेमंत ढोमे. पुन्हा एक नवी सुरूवात.शुभारंभ.


सोनाली कुलकर्णीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर शेवटची ती धुरळा या सिनेमात झळकली होती. या चित्रपटात तिच्यासोबत सई ताम्हणकर, प्रसाद ओक, अमेय वाघ, अंकुश चौधरी हे कलाकार मुख्य भूमिकेत होते. हा चित्रपट राजकारणावर आधारीत असून या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला.

सध्या सोनाली डान्सिंग क्वीन या शोमध्ये परीक्षकाच्या भूमिकेत पहायला मिळते आहे.

Web Title: Sonali Kulkarni's movie name out which is shooting in London, saying - Three cheers to us ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.