"गाणं ही माझी ओळख, माझं अस्तित्व…", केतकी माटेगावकरची 'मराठी संगीत'साठी खास पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 10:05 IST2025-01-31T10:03:52+5:302025-01-31T10:05:19+5:30
Ketaki Mategaonkar: केतकी माटेगावकर मराठी सिनेइंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आणि गायिका आहे. तिने आपल्या सुरेल स्वरांसह अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनावर छाप उमटविली आहे.

"गाणं ही माझी ओळख, माझं अस्तित्व…", केतकी माटेगावकरची 'मराठी संगीत'साठी खास पोस्ट
केतकी माटेगावकर (Ketaki Mategaonkar) मराठी सिनेइंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आणि गायिका आहे. तिने आपल्या सुरेल स्वरांसह अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनावर छाप उमटविली आहे. केतकी सोशल मीडियावर सक्रीय असून ती या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधत असते. नुकतेच तिने मराठी संगीतसाठी खास पोस्ट शेअर केली आहे. यात तिने मराठी गायिका असल्याचा अभिमान वाटत असल्याचेही म्हटले आहे.
केतकी माटेगावकर हिने इंस्टाग्रामवर स्वतःचा फोटो शेअर करत लिहिले की, #संगीतमाझीओळख. गाणं ही माझी ओळख, माझं अस्तित्व… मी अनेक वर्षांपासून या प्रवासात आहे—रियाझ, स्टेज, रेकॉर्डिंग, संगीताचा अभ्यास—हेच सगळं माझं आयुष्य आहे. प्रत्येक सूर, प्रत्येक गाणं काहीतरी शिकवून जातं, आणखी पुढे जाण्याची ऊर्जा देतं.
केतकीने पुढे लिहिले की, मराठी संगीताची जादू जगभर पोहोचावी, आपल्या संगीताचा आत्मा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावा, ही माझी खरी जिद्द आहे आणि हाच माझा ध्यास आहे. एक मराठी गायिका असण्याचा अभिमान आहे! ही ओळख घेऊन अजून पुढे जायचंय, अजून खूप गायचंय ! #संगीतमाझीओळख #मराठीसंगीत #ProudMarathiSinger #EndlessJourney
वर्कफ्रंट
२०१४ साली रिलीज झालेल्या टाईमपास सिनेमातील दगडू आणि प्राजूने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. केतकी माटेगावकर हिने 'तानी', 'शाळा', 'काकस्पर्श', 'टाइमपास', 'फुंतरू' यांसारख्या चित्रपटात काम केले असून यातील तिच्या अभिनयाचं कौतुक देखील झाले आहे. अभिनेत्रीसोबतच ती एक उत्तम गायिका ही आहे.याशिवाय तिने अनेक मालिकांसाठी पार्श्वगायनदेखील केलं आहे. काही सिनेमांसाठीही तिने तिचा आवाज दिला आहे. याशिवाय ती अनेक गाण्यांचे कार्यक्रम करताना दिसते.