​ सोनु गाणार देवा चित्रपटात

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2016 11:56 AM2016-12-23T11:56:48+5:302016-12-23T11:56:48+5:30

सोनु निगम हा बॉलिवूडमधील आघाडीचा गायक आहे. सोनुची गाणी नेहमीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतात. हिंदिच नाही तर सोनुने अनेक भाषांमध्ये ...

In the Sonu Gaan Deew God movie | ​ सोनु गाणार देवा चित्रपटात

​ सोनु गाणार देवा चित्रपटात

googlenewsNext
नु निगम हा बॉलिवूडमधील आघाडीचा गायक आहे. सोनुची गाणी नेहमीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतात. हिंदिच नाही तर सोनुने अनेक भाषांमध्ये गाणी गायली आहेत. मराठी चित्रपटांमध्ये देखील सोनुचा आवाज घुमला आहे. आता पुन्हा एकदा आपल्याला सोनु निगमचा रोमँटिक सुर एका आगामी चित्रपटात ऐकायला मिळणार आहे. होय, लवकरच सोनुचे देवा या मराठी चित्रपटातील एक गाणे प्रेक्षकांच्या भेटिस येणार आहे. देवा या चित्रपटाची बरीच चर्चा काही दिवसांपासुन होतेय. देवा चित्रपटात आपल्याला अंकुश चौधरी, तेजस्वीनी पंडित आणि स्पृहा जोशी हे कलाकार दिसणार आहेत. या चित्रपटाचा संगीतकार अमितराज आहे. अमितराजची सर्वच गाणी आज मराठी चित्रपटसृष्टीत सुपरहिट आहेत. देवा तुझ्या गाभाºयाला उंबराच नाही या गाण्यानंतर अमितराज हा संगीतकार सगळीकडे ओळखू लगाला. अमितराच्या संगीतामध्ये वेगळ््या प्रकारची जादु आहे आसे म्हणणे खरच वावगे ठरणार नाही. आगामी देवा या सिनेमासाठी गायिका फाल्गुनी फाटक यांनी पार्श्वगायन करावे असे अमितची इच्छा होती. परंतू आता यातील एक गाणे सोनु निगम गाणार असल्याचे समजतेय. या गाण्याचे रेकॉर्डिंग देखील पूर्ण झाले असल्याचे कळतेय. सोनु ने गायलेले नवरा माझा नवसाचा या चित्रपटातील  हिरवा निसर्ग हा भवतीने आणि दुनियादारी सिनेमातील टिक टिक वाजते डोक्यात ही दोनही गाणी अजुन प्रेक्षकांच्या मनामध्ये आहेत. आता देवा या चित्रपटामध्ये सोनु नक्की कोणत्या प्रकारचे गाणे गाणार आहे हे मात्र अजुनही गुलदस्त्यातच आहे. परंतू सोनुची सर्वच गाणी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात हे काही नाकारता येणार नाही. सोनुचा आवाज पुन्हा एकदा मराठी चित्रपटात घुमणार एवढे मात्र खरे. 

Web Title: In the Sonu Gaan Deew God movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.