लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोयं ‘बे एके बे’

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2018 05:57 AM2018-05-23T05:57:17+5:302018-05-23T11:27:17+5:30

समाजमनाला आरसा दाखवणारे सिनेमा नेहमीच बनत असतात. अशा सिनेमांची संख्या इतर सिनेमांच्या तुलनेत जरी कमी असली तरी असे चित्रपट ...

Soon after meeting with the audience, 'Bay Aye Bay' | लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोयं ‘बे एके बे’

लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोयं ‘बे एके बे’

googlenewsNext
ाजमनाला आरसा दाखवणारे सिनेमा नेहमीच बनत असतात. अशा सिनेमांची संख्या इतर सिनेमांच्या तुलनेत जरी कमी असली तरी असे चित्रपट कुठे ना कुठे आपला प्रभाव पाडण्यात यशस्वी होतात. एखाद्या व्यवस्थेतील गुण-दोष दाखवण्यामागे त्यात योग्य ती सुधारणा व्हावी इतकाच या सिनेमांमागील हेतू असतो. लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणारा ‘बे एके बे’ हा मराठी सिनेमा शिक्षणव्यवस्थेवर भाष्य करणारा असून समाजातील सत्य परिस्थिती मांडणारा आहे.

निर्माते विकास भगेरीया आणि पूर्णिमा वाव्हळ-यादव यांनी थ्री स्टार एंटरटेनमेंट आणि नमस्ते एंटरटेनमेंट फिल्म्स या बेनरखाली ‘बे एके बे’ या सिनेमाची निर्मिती केली आहे. हेमा फाऊंडेशनचे महेंद्र काबरा आणि अनिता महेश्वरी या सिनेमाचे प्रस्तुतकर्ते असून प्रविण गरजे आणि चिंतामणी हे सहनिर्माते आहेत. सिनेमाची कथा-पटकथा संचित यादव यांनी लिहिली असून दिग्दर्शनाची धुराही सांभाळली आहे. अभिजीत कुलकर्णा यांनी या सिनेमाचे संवादलेखन केलं आहे. या सिनेमाच्या निमित्ताने अशिक्षित समाजाची मानसिकता आणि शिक्षणाबाबतची त्यांची उदासीनता अधोरेखित करण्याचा प्रयत्न दिग्दर्शक संचित यादव यांनी केला आहे. या सिनेमाबाबत यादव म्हणाले की, हे केवळ महाराष्ट्रातील एका गावातील चित्र नसून, आजही आपल्या देशातील अनेक दुर्गम भागात हेच दृश्य पाहायला मिळतंय. ‘बे एके बे’ या सिनेमातील शाळा त्यांचं प्रतिक असल्याचं मानून जरी हा सिनेमा पाहिला तरी समाज बदलाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकलं जाईल असं वाटतं. या सिनेमात कोणालाही उपदेश देण्यात आलेला नसून, एका साध्या सोप्या गोष्टीच्या माध्यमातून सत्य दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

संजय खापरे, जयवंत वाडकर, संचित यादव, पूर्णिमा वाव्हळ-यादव, संतोष आंब्रे, अतुल मर्चंडे आणि अरूण नलावडे यांच्या या सिनेमात प्रमुख भूमिका असून साहिल सितारे, प्रथम सितारे, वैदेही ओव्हळे, स्नेहल भाताडे, सागर गुरव, संचित निर्मळे, पार्थ देशपांडे, अथर्व खारवरकर, साईराज कामेतकर, स्वप्नजा जाधव, समिषा स्लपे, प्राची मेस्त्री, पूजा पोटफाडे, नेहा पावसकर, अविष्कार शेडये आदि बालकलाकारांच्याही या सिनेमात भूमिका आहेत. संचित यादव यांनी संवादलेखक अभिजीत कुलकर्णी यांच्या साथीने लिहिलेल्या ‘बे एके बे’मधील गीतांना संगीतकार विलास गुरव यांनी संगीत दिलं आहे. कॅमेरामन अतुल जगदाळे यांच्या नजरेतून हा सिनेमा प्रेक्षकांना पाहायला मिळणार असून कमल सैगल आणि विनोद चौरसिया यांनी संकलन केलं आहे. देवेंद्र तावडे यांनी कला दिग्दर्शन, ग्राफिक्स शेखर माघाडे, तर संतोष आंब्रे यांनी नृत्य दिग्दर्शन केलं आहे. अतुल मर्चंडे या सिनेमाचे कार्यकारी निर्माते आहेत.

Web Title: Soon after meeting with the audience, 'Bay Aye Bay'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.