जितेंद्रची मुलीसाठी खास कविता
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2016 10:49 AM2016-09-01T10:49:15+5:302016-09-01T16:19:15+5:30
जितेंद्र जोशी मराठी इंडस्ट्रीमधील आघाडीचा अभिनेता आहे हे तर आपल्या सर्वांनाच ...
style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal;">
जितेंद्र जोशी मराठी इंडस्ट्रीमधील आघाडीचा अभिनेता आहे हे तर आपल्या सर्वांनाच माहितीय. जितेंद्र उत्तम कवी देखील आहे. बºयाच कार्यक्रमांमध्ये जितेंद्रने त्याच्या कविता सादर करून प्रेक्षकांची दाद मिळविली आहे. आता जितेंद्रने खास त्याच्या मुलीसाठी एक कविता केली आहे. जितेंद्रला रेवा नावाची ६ वर्षांची गोड मुलगी आहे. आजपर्यंत त्याने अनेक कविता केल्या , पण आता आपल्या लाडक्या लेकीसाठी जिंतेंद्रच्या लेखणीतून दोन शब्द बाहेर पडले आहेत. कभी हथेली में समा जाती थी जो ,आज आँखों में भी समाती नहीं, मासूम सा मौसम होती हैं बेटियाँ, बरसेंगी भी और बदल भी जाएँगी.... जितेंद्रची ही कविता खरच मनाला भिडणारी आहे. या कवितेतून त्याने मुलीप्रती असलेल्या बापाच्या प्रेमाला व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे. मुलींना नेहमीच समाजात दुय्यम समजले जाते. मुलांप्रमाणे मुली प्रगती करू शकत नाहीत किंवा त्यांना संरक्षणासाठी सतत कोणाची तरी गरज लागते असा समज आहे. परंतू जितेंद्रने असे मागास विचार करणाºया समाजाला बेटियाँ, बरसेंगी भी और बदल भी जाएँगी असे ठणकावून सांगितले आहे. नूकतीच जितेंद्रने ही कविता सोशल मिडीयावर अपलोड केली आहे. या कवितेला त्याच्या चाहत्यांकडून अनेक लाईक्सही मिळत आहेत.