स्पृहा जोशी का झाली भावूक?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2016 03:35 PM2016-12-16T15:35:31+5:302016-12-16T15:35:31+5:30
प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री स्पृहा जोशी ही छान कविता करते हे सर्वानाच माहिती आहे. तसेच तिचा लोपामुद्रा नावाचा कविता संग्रहदेखील ...
प रेक्षकांची लाडकी अभिनेत्री स्पृहा जोशी ही छान कविता करते हे सर्वानाच माहिती आहे. तसेच तिचा लोपामुद्रा नावाचा कविता संग्रहदेखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. म्हणजेच आपल्या अभिनयाप्रमाणेच तिने आपल्या कवितेनेदेखील प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. अशी ही मराठी इंडस्ट्रीची सुंदर अभिनेत्री भावूक झालेली सोशलमीडियावर पाहायला मिळत आहे. कारण नुकतेच स्पृहाच्या एका चाहतीने तिला लोपामुद्रा हा तिचा काव्यसंग्रह भेट म्हणून दिला आहे. विशेष म्हणजे तिच्या या चाहतीने तिचा हा काव्यसंग्रह मोडी लिपीत लिहून तिला भेट दिला आहे. त्यामुळे स्पृहा खूपच चकित आणि भावूक झालेली पाहायला मिळत आहे. स्पृहाने तिचा हा अनुभव सोशलमीडियावर शेअर केला आहे. ती आपल्या पोस्टच्यामाध्यमातून सोशलमीडियावर सांगते, परवाची गोष्ट. अहमदनगरहून गिरीजा दुधाट नावाची ही छोटी मैत्रीण मला भेटायला आली. बरेच दिवस फोनाफोनी झाल्यावर फायनली आम्ही भेटलो. आणि तिने मला चकितच केलं. या बडबड्या, उत्साही मुलीने माझा 'लोपामुद्रा' हा काव्यसंग्रह अख्खाच्या अख्खा मोडी लिपीत लिहून काढलाय. स्वत:च्या हाताने! काय बोलावं तेच सुचत नव्हतं. इतिहासजमा होत चाललेली 'मोडी लिपी' टिकवून ठेवण्याच्या जिद्दीने गिरीजा वाटचाल करतेय. तिला पुढे जाऊन आर्कियोलॉजीचा अभ्यास करायचाय. तिला मनापासून शुभेच्छा. आणि थँक यू गिरीजा या सुंदर गिफ्टसाठी. हे गिफ्ट आणि त्यामागच्या तुज्या भावना खरोखरच अनमोल आहेत. स्पृहाला आपल्या या छोटया चाहतीची अनमोल भेट नक्कीच अविस्मरणीय ठरेल यात शंकाच नाही. स्पृहाने पैसा पैसा, लॉस्ट अँण्ड फाउंड, बायस्कोप असे अनेक चित्रपट केले आहेत.