‘होम स्वीट होम’मध्ये अल्लड स्पृहा जोशी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2018 06:33 PM2018-10-01T18:33:27+5:302018-10-01T18:35:16+5:30

हृषीकेश जोशी दिग्दर्शित ‘होम स्वीट  होम’ चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून सध्या या चित्रपटाची सर्वत्र चर्चा सुरु आहे.

Sprha Joshi in 'Home Sweet Home' | ‘होम स्वीट होम’मध्ये अल्लड स्पृहा जोशी

‘होम स्वीट होम’मध्ये अल्लड स्पृहा जोशी

googlenewsNext
ठळक मुद्देस्पृहा जोशी देविकाच्या भूमिकेतआजच्या पिढीतील बिनधास्त आयुष्य जगणारी तरुणीच्या रुपात स्पृहा


हृषीकेश जोशी दिग्दर्शित ‘होम स्वीट  होम’ चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून सध्या या चित्रपटाची सर्वत्र चर्चा सुरु आहे. कर्णमधुर संगीत, सुंदर कविता आणि प्रतिभासंपन्न कलाकारांच्या उत्कृष्ट अभिनयाने सजलेला ‘होम स्वीट होम’ प्रेक्षकांच्या काळजाला भिडला आहे.

एका मध्यमवर्गीय कुटुंबाची कथा या चित्रपटात असून स्पृहा जोशीने कुटुंबातील सर्वात धाकटी सदस्य असलेल्या देविकाची व्यक्तीरेखा साकारली आहे. हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेणारी देविका आजच्या पिढीतील बिनधास्त आयुष्य जगणारी तरुणी आहे. एका हातात मोबाईल, कानात हेडफोन्स, दुसऱ्या हातात कॉफीचा मग आणि कॉलेज मित्रांसोबत मज्जा, मस्ती करणारी ती अतिशय अल्लड, खट्याळ स्वभावाची मुलगी असली तरी, समजूतदार सुद्धा आहे. कॉलेजला जाणारी प्रत्येक मुलगी या देविकाशी स्वतःला कनेक्ट करू शकते. चित्रपटात मोहन जोशी आणि रीमा यांच्यासह इतर कलाकारांशी स्पृहाचे सूर उत्तम जुळले आहेत. माणसाच्या आयुष्यातील भौतिक सुखांपैकी सर्वात अमुल्य ठेव म्हणजे त्याचे स्वतःचे घर. कुटुंबाच्या निरनिराळ्या आठवणी जपणाऱ्या याच घराबद्दल फ्रेम्स प्रॉडक्शन कंपनी प्रा. लि. निर्मित आणि प्रोऍक्टिव्ह प्रस्तुत ‘होम स्वीट होम’ अनोख्या अंदाजात भाष्य करतो.
चित्रपटाची निर्मिती फ्रेम्स प्रॉडक्शन कंपनी प्रा. लि. यांची असून प्रोअॅक्टिव्ह प्रस्तुतकर्ते आहेत. हृषीकेश जोशी दिग्दर्शित  ‘होम स्वीट होम’ या चित्रपटात दिवंगत अभिनेत्री रीमा तसेच मोहन जोशी, हृषीकेश जोशी, स्पृहा जोशी, प्रसाद ओक, विभावरी देशपांडे, सुमीत राघवन, मृणाल कुलकर्णी, क्षिती जोग, दीप्ती लेले, अभिषेक देशमुख यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 

Web Title: Sprha Joshi in 'Home Sweet Home'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.