"आपल्या सगळ्यांमध्ये दडलेला असतो एक सुपरहिरो", स्पृहा-आदिनाथच्या 'शक्तिमान'चा ट्रेलर प्रदर्शित
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2024 13:20 IST2024-05-13T13:20:00+5:302024-05-13T13:20:23+5:30
'शक्तिमान' सिनेमाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. या सिनेमात आदिनाथ कोठारे आणि स्पृहा जोशी मुख्य भूमिकेत आहेत.

"आपल्या सगळ्यांमध्ये दडलेला असतो एक सुपरहिरो", स्पृहा-आदिनाथच्या 'शक्तिमान'चा ट्रेलर प्रदर्शित
'शक्तिमान' या नव्या मराठी सिनेमाची घोषणा काही दिवसांपूर्वीच करण्यात आली. या सिनेमातूनस्पृहा जोशी आणि आदिनाथ कोठारे ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अक्षय्य तृतीयेच्या मुहुर्तावर या सिनेमाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं होतं. आता 'शक्तिमान' सिनेमाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे.
आदिनाथ कोठारे 'शक्तिमान' सिनेमात एका वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. या सिनेमातून एका मुलीचे प्राण वाचवण्यासाठी सुपरहिरो बनलेल्या सामान्य व्यक्तीची गोष्ट दाखविण्यात येणार आहे. हृदयाचा आजार असल्यामुळे चिमुकलीचे हार्ट ट्रान्सप्लांट करायचं असतं. या गरीब कुटुंबातील मुलीसाठी सिद्धार्थची भूमिका साकारणारा आदिनाथ कोठारे धावून येत असल्याचं ट्रेलरमध्ये दिसत आहे. या मुलीचे प्राण वाचवण्यासाठी सिद्धार्थ शर्थीचे प्रयत्न करत असल्याचं ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे.
'शक्तिमान' सिनेमाच्या २.१३ मिनिटांच्या ट्रेलरने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे. सुपरमॅनची व्याख्या या ट्रेलरमध्ये आदिनाथ सांगताना दिसत आहे. या सिनेमात आदिनाथ कोठारे आणि स्पृहा जोशी मुख्य भूमिकेत आहेत. याशिवाय प्रियदर्शन जाधवही महत्त्वाच्या भूमिकेत आहे. २४ मे रोजी हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.