पहिला पाऊस असतो खास, स्पृहा जोशीने शेअर केला पहिल्या पावसाचा आनंद घेतानाचा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2019 06:00 IST2019-06-27T06:00:00+5:302019-06-27T06:00:00+5:30
आपल्या घराच्या खिडकीतून पहिल्या पाऊसधारांचा आनंद घेत असल्याचा फोटो स्पृहाने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

पहिला पाऊस असतो खास, स्पृहा जोशीने शेअर केला पहिल्या पावसाचा आनंद घेतानाचा फोटो
पाऊस प्रत्येकालाच हवाहवासा वाटतो. विशेषतः प्रचंड उकाड्यानंतर पाऊसधारा कधी बरसणार याची प्रत्येकजण चातकाप्रमाणे वाट पाहत असतो. त्यातच पहिल्या पावसाची मजा काही औरच असते. पहिला पाऊस, त्यानंतर येणारा मातीचा सुगंध प्रत्येकाला वेगळाच आनंद देऊन जातो. सर्वसामान्यांप्रमाणे सेलिब्रिटी मंडळीही पहिल्या पावसाचा आनंद घेतात. अभिनेत्री स्पृहा जोशी हिनंही पहिल्या पावसाचा आनंद घेतला. आपल्या घराच्या खिडकीतून पहिल्या पाऊसधारांचा आनंद घेत असल्याचा फोटो स्पृहाने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
स्पृहा एक कवयित्रीसुद्धा आहे. त्यामुळे पहिला पाऊस तिच्यासाठी नक्कीच खास आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील गुणी आणि प्रतिभावंत अभिनेत्री म्हणून स्पृहा जोशीची ओळख आहे.. आपल्या अभिनयाने स्पृहाने रसिकांची मनं जिंकली आहेत.
'मोरया', 'पैसा पैसा' यासह विविध चित्रपटातील भूमिकांमधून स्पृहाने आपल्या अभिनयाची छाप पाडली. याशिवाय छोट्या पडद्यावरही मालिकांमधून तिने जादू दाखवली आहे. स्पृहा सोशल मीडियावरही बरीच सक्रिय आहे. सोशल मीडियावर ती आपले फोटो आणि कविता तसंच विचार शेअर करत असते.