हा प्रसिद्ध भारतीय क्रिकेटर झळकणार मराठी चित्रपटात

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2020 07:16 PM2020-02-21T19:16:52+5:302020-02-21T19:19:42+5:30

या क्रिकेटरच्या चित्रपटाचे चित्रीकरण एप्रिल महिन्यात सुरू होणार आहे.

Sreesanth to make his Marathi debut with 'Mumbaicha Vada Pav' | हा प्रसिद्ध भारतीय क्रिकेटर झळकणार मराठी चित्रपटात

हा प्रसिद्ध भारतीय क्रिकेटर झळकणार मराठी चित्रपटात

googlenewsNext
ठळक मुद्देश्रीसंतच्या मराठी चित्रपटाचे नाव मुंबईचा वडापाव असून या चित्रपटाची निर्मिती पीके अशोकन आणि मेहराली पोईलंगल इस्माइल करत आहे. हे दोघेही मल्याळम इंडस्ट्रीशी संबंधित आहेत

क्रिकेटर श्रीसंत गेल्या काही दिवसांपासून अभिनयक्षेत्रात आपला जम बसवण्याचा प्रयत्न करत आहे. त्याने काही हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटात काम केले आहे. अक्सर 2 आणि कॅबरेट या हिंदी तर काही दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये तो झळकला होता. तसेच एक खिलाडी एक हसीना या रिअ‍ॅलिटी शोमध्ये सुरवीन चावलासोबत त्याने भाग घेतला होता. तसेच झलक दिखला जा या डान्स रिअ‍ॅलिटी शोमध्ये त्याच्या डान्सचा जलवा त्याच्या फॅन्सना पाहायला मिळाला होता. बिग बॉस, फिअर फॅक्टर यांसारख्या प्रसिद्ध कार्यक्रमांमध्ये देखील तो स्पर्धकाच्या भूमिकेत दिसला होता. आता श्रीसंत मराठी चित्रपटात काम करण्यास सज्ज झाला आहे.

श्रीसंतच्या मराठी चित्रपटाचे नाव मुंबईचा वडापाव असून या चित्रपटाची निर्मिती पीके अशोकन आणि मेहराली पोईलंगल इस्माइल करत आहे. हे दोघेही मल्याळम इंडस्ट्रीशी संबंधित असून मल्याळम आणि मराठी इंडस्ट्रीतील अनेक प्रसिद्ध कलाकार या चित्रपटात झळकणार असल्याचे म्हटले जात आहे. या चित्रपटातील श्रीसंतची व्यक्तिरेखा त्याने आजवर चित्रपटात साकारलेल्या भूमिकांपेक्षा वेगळी असल्याची चर्चा रंगली आहे.

श्रीसंतच्या मुंबईचा वडापाव या मराठी चित्रपटाचे चित्रीकरण एप्रिल महिन्यात सुरू होणार असून या चित्रपटाचे चित्रीकरण पुण्यात आणि नाशिकमध्ये होणार आहेत. या चित्रपटाविषयी अधिकृत घोषणा लवकरच चित्रपटाच्या निर्मात्यांकडून केली जाणार आहे. 

श्रीसंतने भारतासाठी अनेक क्रिकेट मॅचेस खेळल्या. पण आयपीएलमधील स्पॉट-फिक्सिंग प्रकरणामध्ये श्रीसंतवर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याच्यावर बंदी घालण्यात आली. 

Web Title: Sreesanth to make his Marathi debut with 'Mumbaicha Vada Pav'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.