​लाकडापासून बनवले स्टार वॉर्स यान

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2016 09:56 AM2016-02-17T09:56:45+5:302016-02-17T02:56:45+5:30

सत्तरच्या दशकापासून अबालवृद्धांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ‘स्टार वॉर्स’चे संपूर्ण जगात डाय हार्ड फॅन्स आहेत. त्यांची स्टार वॉर्स फॅन कम्युनिटीच ...

Star Wars War made from wood | ​लाकडापासून बनवले स्टार वॉर्स यान

​लाकडापासून बनवले स्टार वॉर्स यान

googlenewsNext
्तरच्या दशकापासून अबालवृद्धांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ‘स्टार वॉर्स’चे संपूर्ण जगात डाय हार्ड फॅन्स आहेत. त्यांची स्टार वॉर्स फॅन कम्युनिटीच आहे असे म्हणा ना. त्यामध्ये एक से बढकर एक अवलिया आहे.

आता मार्टिन क्रेअनीचेच उदाहरण घ्या ना. या पठ्याने वर्षाभराच्या अथक मेहनतीने हाताने लाकडाच्या तीन हजार तुकड्यांना आकार देऊन चित्रपटातील मिलेनियम फाल्कन यानाची भव्य दिव्य प्रतिकृती निर्माण केली आहे.

star

आॅस्ट्रेलियाच्या मार्टिनने ४ मे २०१४ मध्ये या प्रोजेक्टला सुरुवात केली होती. प्रारंभी मेडियम डेन्सिट फायबरबोर्डपासून (एमडीएफ) यानाची मुख्य फ्रेम बनवली; मात्र यानाची संपूर्ण डिझाईन तयार करण्यासाठी त्याने हाताने लाकडाला आकार दिला.

दहा वर्षांपूर्वी त्याने खरेदी केलेल्या मिलेनियम फाल्कन खेळणीवरून त्याने संपूर्ण यानाचा आराखडा तयार केला.

star

सहा फुट लांब आणि पाच फुट रूंद प्रतिकृतीच्या छोट्यातील छोट्या भागाचा आकार, सुबकता, रंग पाहिला असता मार्टिनने घेतलेली मेहनत आणि त्याची कलाकुसर स्पष्टपणे दिसून येते.

यापूर्वी त्याने चित्रपटातील आर२डी२, एटी-एसटी वाल्कर, एक्स-विंग फायटर अशा प्रतिकृती तयार केलेल्या आहेत. यावेळी काही तरी भव्य करण्याचा त्याचा मानस होता. म्हणून त्याने कृत्रिम एमडीएफच्या ऐवजी नैसर्गिक लाकडाचा वापर करण्याचा निर्णय घेतला होता.

star

Web Title: Star Wars War made from wood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.