'रेडू' चा 'करकरता कावळो' गाण्याला मिळतोय रसिकांचा तुफान प्रतिसाद

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2018 08:27 AM2018-05-05T08:27:52+5:302018-05-05T15:10:32+5:30

लँडमार्क फिल्मच्या विधि कासलीवाल प्रस्तूत आणि नवल फिल्म्सचे नवलकिशोर सारडा निर्मित,ब्लिंक मोशन पिक्चर प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सहयोगाने येत्या १८ ...

A storm surge of rumors of 'Raidu' singing 'Kaavbo for doing' | 'रेडू' चा 'करकरता कावळो' गाण्याला मिळतोय रसिकांचा तुफान प्रतिसाद

'रेडू' चा 'करकरता कावळो' गाण्याला मिळतोय रसिकांचा तुफान प्रतिसाद

googlenewsNext
डमार्क फिल्मच्या विधि कासलीवाल प्रस्तूत आणि नवल फिल्म्सचे नवलकिशोर सारडा निर्मित,ब्लिंक मोशन पिक्चर प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सहयोगाने येत्या १८ मे रोजी प्रदर्शित होत असलेला, सर्वोत्कृष्ट राज्य पुरस्कारप्राप्त 'रेडू' या सिनेमातील, 'करकरता कावळो' हे गाणे टीव्ही तसेच सोशल नेट्वर्किंग साईटवर नुकतेच लाँँच करण्यात आले.या गाण्याचे लेखन आणि संगीत राज्य पुरस्कारप्राप्त विजेते विजय नारायण गवंडे यांचे असल्यामुळे हे गाणे रसिकांसाठी मनोरंजनाची मोठी मेजवानी ठरणार आहे. तसेच, अमिता घुगरी आणि प्रवीण कुंवर या स्थानिक कलाकारांकडून हे गाणे गाऊन घेतले असल्यामुळे या गाण्यात 'कोकणचो धम्माल' सिनेप्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.ग्रामीण जीवनातील हलकेफुलके विनोद मांडणा-या या सिनेमात मराठी-मालवणी भाषेचा सर्वाधिक वापर करण्यात आला आहे. त्यामुळे निसर्गाने नटलेल्या कोकणी संस्कृतीशी जवळीक साधण्याची नामी संधी 'रेडू'च्या निमित्ताने शहरी प्रेक्षकांना मिळणार आहे.शशांक शेंडे आणि छाया कदम यांची प्रमुख भूमिका असलेल्या या सिनेमात रेडियोची गमतीदार गोष्ट सांगण्यात आली आहे.'करकरता कावळो' या गाण्यामध्येदेखील ही मज्जा दिसत असून, सामान्य माणसाच्या आयुष्यातील आनंदाचे क्षण या गाण्यात टिपले आहे.सर्वोत्कृष्ट राज्य पुरस्कारप्राप्त सागर छाया वंजारी दिग्दर्शित आणि संकलित 'रेडू' या सिनेमाला नुकत्याच झालेल्या ५५ व्या महाराष्ट्र राज्य पुरस्कार सोहळ्यात आणि दिल्लीतल्या दादासाहेब फाळके चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा किताब मिळाला आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात लवकरच प्रदर्शित होत असलेला हा 'रेडू' चांगलाच आवाज करणार, यात शंका नाही.

प्रतिष्ठेचा अरविंदन पुरस्कार प्राप्त 'रेडू' चित्रपटाने राज्य पुरस्कारांमध्येही आपला डंका वाजवला आहे. राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे दरवर्षी देण्यात येणाऱ्या राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात एकूण ७ सर्वोत्कृष्ट पूरस्कारांवर सागर छाया वंजारी दिग्दर्शित 'रेडू'ने आपले नाव कोरले आहे.नुकताच दिमाखात पार पडलेल्या ५५ व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सवात 'रेडू' सिनेमाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला असून श्रीकांत देसाई यांना सर्वोत्कृष्ट रंगभूषेचा घोषित पुरस्कारदेखील जाहीर करण्यात आला.यासोबतच सागर छाया वंजारी यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा सन्मान मिळाला आहे. तसेच सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी शशांक शेंडे यांना तर सर्वोत्कृष्ट पटकथेसाठी संजय नवगिरे, सर्वोत्कृष्ट संगीतसाठी विजय नारायण गवंडे आणि सर्वोत्कृष्ट गायकासाठी अजय गोगावले यांना पुरस्कार मिळाला आहे.



Web Title: A storm surge of rumors of 'Raidu' singing 'Kaavbo for doing'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.