अशी आहे गोष्ट 'बारायण'ची
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2018 09:40 AM2018-01-11T09:40:14+5:302018-01-11T15:10:14+5:30
हीच ती वेळ! येईल येईल म्हणता आली.. तिच्या स्वागतासाठी सगळच घर लगबग करत होत. अभ्यासिका सजत होत्या.. माणसांचा उत्साह ...
ह च ती वेळ! येईल येईल म्हणता आली.. तिच्या स्वागतासाठी सगळच घर लगबग करत होत. अभ्यासिका सजत होत्या.. माणसांचा उत्साह तर विचारूच नका, गरज नसलेले फुकट बडबड करणारे इडियट बॉक्स कोपऱ्यात रुसून अगदी गप्प बसले होते. रात्री जळणाऱ्या दिव्यांना हिरवा कंदील मिळाला होता. अगदी झोपेशीही तडजोड केली जात होती.. तीही हसतमुखाने! नाही म्हणायला टेन्शन नावाची एक पाल सतत चुकचुकत असायची पण तिला पळवून लावण्यासाठीही बरेच उपाय योजण्यात येत होते. प्रत्येकाच्या घरी येते ती झोप उडवायला. ...बारावी! आयुष्याच्या एका वळणावर तिचा सामना करावाच लागतो.
‘बारायण’ या आगामी चित्रपटातील ‘अनिरुद्ध’ ची तर अगदी साग्रसंगीत तयारी चालली आहे. दिमतीला आई बाबा आणि लहान बहिण चैतू. हवं नको पाहायला आई, मानसिक आधार बाबांचा आणि फुकटचे सल्ले द्यायला इतर शेजारी आणि मित्र नेहमीच रिकामे. एकूणच आजच्या काळातली बारावी हा खरंच आयुष्याचा टर्निंग पोइंट आहे का...? या प्रश्नाचे उत्तर शोधणारा चित्रपट म्हणून ‘बारायण’ चे कौतुक वाटते. शिक्षण पद्धतीवर टीका करण्यापेक्षा आपण सर्व एक समाज म्हणून देखील कसे या पद्धतीचा भाग आहोत हे सिनेमाच्या वेगवेगळ्या पात्रांमधून सहज आणि तितक्याच मनोरंजक पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न बारायण मध्ये दिसतो.
आजच्या काळात परीक्षेचे, त्यातही बारावीच्या परीक्षेचे औडांबर जरा जास्तच माजले आहे.त्यात पालकांच्या अपेक्षा, विद्यार्थ्याची स्वताची उमलू पाहणारी स्वप्न,आपल्या पाल्याने आपल्याला हव ते करीअर करण्यासाठी पालकांची धडपड.करियर विषयी चुकीच्या संकल्पना या सर्व गोंधळात विद्यार्थ्याचा परीक्षार्थी होतो. या परिस्थितीतूनही काही विद्यार्थी अलगदपणे बाहेर येतात. काही स्वतःला ओळखायला शिकतात. काही स्वतःची ओळख निर्माण करतात. ‘बारायण’ मध्ये अश्या सर्व मुलांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अनिरुद्ध च नक्की काय होत? आई बाबा, नातेवाईक, समाज आणि आपण स्वतः यामध्ये विजय कोणाचा होतो? कोणाचा व्हायला हवा? यावर आधारलेला ‘बारायण’ हा चित्रपट मुलांच्या मनाविषयी, पालकांच्या अपेक्षेविषयी अलगद आरसा दाखवतो. कोणाच्याही भावना न दुखावता काय करावं याच मार्गदर्शन करतो. पुढच्या वाक्यात अडकवत, शब्दांत गुंतवून ठेवणारे संवाद विचार करायला भाग पाडतात. पटकथेची स्वच्छ मांडणी आणि टेक्निकली उच्चतम पातळी गाठणारा ‘बारायण’, मराठी सिनेमा देखील रुपेरी पडद्यावर उत्कृष्ट आणि दर्जेदार पद्धतीने मांडता येऊ शकतो याची ग्वाही देतो. थर्ड आय एशियन फिल्म फेस्टिवल मध्ये प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेला ‘बारायण’ हा सिनेमा आज १२ जानेवारीला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतोय.
शायना एन सी प्रस्तुत, दैवता पाटील यांच्या ओंजळ आर्ट्स निर्मित ‘बारायण’ हा सिनेमा दीपक पाटील यांनी दिग्दर्शित केला आहे. बारावी आणि आयुष्यातील इतर परीक्षांकडे सकारात्मक पाहण्याची दिशा असलेला हा चित्रपट तुम्हाला तुमचे शाळा कोलेज चे ते मंतरलेले दिवस आठवायला प्रवृत्त करेल. अनिरुद्ध च्या मुख्य भूमिकेत दिसणाऱ्या अनुराग वरळीकरने अतिशय सोज्वळपणे बारावीकर वठवायचा प्रयत्न केला आहे. लहानी चैतू म्हणजेच स्वरांगी साने तुम्हाला संपूर्ण चित्रपट पाहताना कंटाळा येऊ देत नाही. प्रतीक्षा लोणकर यांनी आईची भूमिका ज्या तन्मयतेने रंगवली आहे कि पाहणार्याला आपल्याच घरातील गोष्ट घडत असल्यासारखे वाटते. संजय मोने, नंदू माधव, वंदना गुप्ते यांनी आपल्या खास शैलीत चित्रपटात रंगत भरली आहे. कुशल बद्रिके, निपुण धर्माधिकारी आणि प्रार्थना बेहेरे यांच्या आकस्मिक एन्ट्री ने चकित व्हायला होते. गोष्ट अभ्यासाची असली तरी धमाल मस्ती करत विद्यार्थी, पालक आणि सर्व कुटुंबाचे मनोरंजन ‘बारायण’ करेल याची खात्री वाटते.