रेश्टीपमध्ये बाप-लेकीची कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2016 02:00 PM2016-11-28T14:00:32+5:302016-11-28T14:08:46+5:30

   priyanka londhe बाप-लेकीची हळवी कहाणी प्रेक्षकांना रेश्टीप या आगामी मराठी चित्रपटामध्ये दिसणार आहे. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला ...

The story of father-in-law in the Rastech | रेश्टीपमध्ये बाप-लेकीची कहाणी

रेश्टीपमध्ये बाप-लेकीची कहाणी

googlenewsNext
 
m>  priyanka londhe

बाप-लेकीची हळवी कहाणी प्रेक्षकांना रेश्टीप या आगामी मराठी चित्रपटामध्ये दिसणार आहे. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे समजतेय. नुकतेच या चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले आहे.  अभिनेता स्वप्नील कारीकर प्रथमच या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर आगमन करत आहे. स्वप्नीलने याआधी अनेक मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या. या चित्रपटामध्ये देखील तो एक दमदार भूमिका साकारित आहे. एवढेच नाही तर या चित्रपटाचा तो कार्यकारी निर्माता देखील आहे. या चित्रपटातील त्याच्या अनुभवाविषयी तो  लोकमत सीएनएक्सला सांगतो, ''पहिल्यांदाच चित्रपटात काम करण्याचा माझा अनुभव अतिशय कडक होता असेच मी सांगेन. कारण तीन तासाच्या एका चित्रपटामध्ये तुम्हाला अनेक गोष्टी करता येतात. बरेच काही शिकता येते. बरे मी या चित्रपटामध्ये फक्त भूमिकाच साकारली नाही तर या चित्रपटासाठी मी कार्यकारी निर्माता म्हणून काम देखील पाहिले आहे. दोन मोठ्या जबाबदाऱ्या या चित्रपटासाठी मला पेलाव्या लागल्या असल्याचे त्याने सांगितले. या चित्रपटाचे नाव एकदमच अनोखे आहे. रेश्टि या शब्दाचा अर्थ आहे लपाछपी. हा विदर्भातील एकदमच प्रसिद्ध शब्द आहे. म्हणूनच तर भावनांचा खेळ अशी टॅगलाईन या चित्रपटाच्या नावापुढे आहे. यावरूनच बाप-लेकीच्या हळूवार भावनांचा खेळ प्रेक्षकांना या चित्रपटात दिसणार असल्याचे समजते. चित्रपटाचे चित्रीकरण नागपूर आणि काही छोट्या गावांमध्ये झाले असल्याने या चित्रपटाला थोडा ग्रामीण बाज असल्याचे कळतेय. वडील आणि त्यांच्या ७ वर्षांच्या चिमुकल्या मुलीभोवती या चित्रपटाचे संपूर्ण कथानक फिरत असल्याचे स्वप्नीलने सांगितले. या चित्रपटामध्ये आपल्याला अनुप चौधरी, यतीन कार्येकर, भाग्यश्री मोटे, रत्ना कोल्हापूरे, रिद्धी लोहे हे कलाकार पहायला मिळणार आहेत. 

 

Web Title: The story of father-in-law in the Rastech

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.