"कथा मातृत्वाची, कथा संघर्षाची, कथा त्यागाची, कथा जिद्धीची" “ माँ तुझे सलाम ’’

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2018 09:39 AM2018-01-03T09:39:20+5:302018-01-03T15:09:20+5:30

​“स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिखारी ” हि म्हण अगदी तंतोतंत खरी वाटते. आईचे मातृत्व, प्रेम, ममता याला कुठलीच परिसीमा ...

"Story of Matthood, Story of Conflict, Story of Discrimination, Story Stories" "Mother Tribute You" | "कथा मातृत्वाची, कथा संघर्षाची, कथा त्यागाची, कथा जिद्धीची" “ माँ तुझे सलाम ’’

"कथा मातृत्वाची, कथा संघर्षाची, कथा त्यागाची, कथा जिद्धीची" “ माँ तुझे सलाम ’’

googlenewsNext
स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिखारी ” हि म्हण अगदी तंतोतंत खरी वाटते. आईचे मातृत्व, प्रेम, ममता याला कुठलीच परिसीमा नाही. आईची निस्वार्थ भावना, त्याग यातूनच कितीतरी महान समाजवंताचा जन्म झाला ज्यांनी मानवतेला व समाजाला एक नवीन दिशा देण्याचे कार्य केले. त्यातील एक म्हणजे पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने. त्यांच्या आईने म्हणजे सौ. अंजनाबाई लहाने यांनी तात्यारावांना आपल्या एका किडनीचे दान देऊन त्यांना दुसऱ्यांदा जन्म दिला व मुलाने देखील हा जन्म सत्कारणी लावला व लाखो दृष्टीहीन लोकांना दृष्टी दिली. या आईला व समाजातील प्रत्येक आईला मानाचा मुजरा म्हणजे “ माँ तुझे सलाम ’’. हा कार्यक्रम दि. ८ जानेवारी २०१८ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात विविध १०१ ठिकाणी घेण्याचा आमचा प्रयत्न आहे असे “डॉ तात्या लहाने |अंगार ...पॉवर इज within” या चित्रपटाचे निर्माते / दिग्दर्शक व अनेक विश्वविक्रम नोंदविणारे विराग मधुमालती वानखडे यांनी प्रतिपादन केले. अहमदनगर येथील कार्यक्रमात महान समाजसेवक श्री. अण्णाजी हजारे, पद्मश्री. डॉ. तात्याराव लहाने, सौ. अंजनाबाई लहाने, डॉ. विठ्ठल लहाने, राष्ट्रपती पुरस्कार मिळवलेले समाजसेवक डॉ. गिरीश कुलकर्णी हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमातून आपण १०१ ठीकाणी समाजातील विविध क्षेत्रात कामगिरी करणाऱ्या आईंचे सत्कार करून त्यांना मानवंदना देणार आहोत. आपल्या मुंबई शहरांत देखील १५ ठिकाणी सदर कार्यक्रम आयोजित केला असून संपूर्ण चमूच्या प्रयत्नांनी त्याला साकार रूप येत आहे. “डॉ तात्या लहाने |अंगार ...पॉवर इज विदइन” या चित्रपटाने आधीच एक विश्वविक्रम करून जिनिअस वर्ल्ड रेकॉर्ड  rds मध्ये नाव नोंदविले असून निर्माता / दिग्दर्शक विराग मधुमालती यांच्या नावे आजवर ४ विश्वविक्रम आहे. दिव्यांगांचे दु:ख जगापर्यंत पोहोचविण्यासाठी व नेत्रदानाच्या प्रचारासाठी १०० दिवस विराग यांनी स्वत:च्या डोळ्यांवर पट्टी बांधून जनहिताचे कार्य केले आहे.

हा त्यांचा चित्रपट येणाऱ्या १२ जानेवारीला २०१८ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाने आधीच सिनेरसिकांच्या मनांत बरीच कुतूहलता निर्माण केली असून सर्वांना त्याचे वेध लागले आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना व समाजातील प्रत्येक वर्गाला नवचैतन्य , प्रेरणा व शून्यातून विश्व निर्माण करण्याची उमेद मिळेल. शिवाय अवयवदान व आईची हृदयस्पर्शी सत्यकथा बघावयास मिळणार आहे असा विश्वास विराग मधुमालती व चित्रपटाची प्रस्तुतकर्ती सौ. रीना अग्रवाल यांनी व्यक्त केला आहे. 

या चित्रपटात अभिनेता मकरंद अनासपुरे हे डॉ. लहाने यांच्या प्रमुख भूमिकेत असून, अलका कुबल ह्या त्यांच्या आई अंजना बाईंच्या भूमिकेत आहेत. डॉ. रागिणी पारेख यांच्या भूमिकेत डॉ निशिगंधा वाड असून भारत गणेशपुरे व रमेश देव यांनीही विशेष भूमिका साकारल्या आहेत. महत्वाचे म्हणजे चित्रपटाच्या उत्पन्नातून समाजसेवेचा वसा पुढे जावा या उदात्त हेतूने गोरगरीबांसाठी धर्मदाय डोळ्यांचे नेत्रालय उभारण्याचा डॉ. तात्याराव लहाने व विराग मधुमालती यांचा मानस आहे. 

Web Title: "Story of Matthood, Story of Conflict, Story of Discrimination, Story Stories" "Mother Tribute You"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.