​पार्ट टाईम जॉब करणाऱ्या रमेशची वंटास कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2018 10:39 AM2018-04-30T10:39:04+5:302018-04-30T16:09:04+5:30

निर्माते अमोल बापूराव लवटे यांच्या गुरूकृपा प्रॉडक्शन एन्टरटेनमेंटनी निर्मित असलेल्या वंटास चित्रपटाला प्रदर्शनापूर्वीच तरुणाईने डोक्यावर घेतले आहे. "तुझ्या रूपाचं ...

The story of Ramesh, who is part-time job interviewer | ​पार्ट टाईम जॉब करणाऱ्या रमेशची वंटास कहाणी

​पार्ट टाईम जॉब करणाऱ्या रमेशची वंटास कहाणी

googlenewsNext
र्माते अमोल बापूराव लवटे यांच्या गुरूकृपा प्रॉडक्शन एन्टरटेनमेंटनी निर्मित असलेल्या वंटास चित्रपटाला प्रदर्शनापूर्वीच तरुणाईने डोक्यावर घेतले आहे. "तुझ्या रूपाचं चांदण टिपूर..." आणि 'कोंबडं करतंय कुकुटकु" या गाण्यांनी तर महाराष्ट्राला वेड लावलंय. ज्ञानेश्वर यादवराव उमक यांनी दिग्दर्शित केलेल्या "वंटास" चित्रपटाला पंकज पडघन यांचे सुमधुर संगीत लाभले आहे तर कार्यकारी निर्माता म्हणून शैलेंद्र पवार यांनी काम पाहिलंय.
सोन्याची म्हणजे सोनं चांदी नव्हे तर त्याहून अधिक चमकणाऱ्या रमेशची कहाणी. दोन मोठी भावंड पाठीशी होती, तरीही त्याने आपल्या शिक्षणाचे ओझं न देता आपण स्वतः बाहेर काम करून त्याने आपले दहावीचे वर्ष यशस्वीरीत्या पूर्ण केलं आणि चांगल्या मार्काने उत्तीर्ण झाला. याकाळात त्याची धावपळ व्हायची. पण शिक्षण हे एकच ध्येय त्याला गाठायचे होते. परीक्षेची फी, पुस्तकाचा खर्च यासाठी त्याला बरेच कष्ट करावे लागले. त्याचे मोठे भाऊ उमेश आणि नागेश वेदपाठक यांना त्याची जाणीव होती. त्याची धडपड,  जिद्द पाहून त्यांनी त्याला मदत केली.
अभिनय त्याला जमायचा नाही. घरी ही त्याचा शांत स्वभाव असायचा. खट्याळ वागणे त्याला येत नव्हते. पण नाइन्टी (90) या विनोदी पात्राची भूमिका त्याने "वंटास" चित्रपटात स्वीकारली आणि अशा पद्धतीने रमेश नाइन्टी बनला आणि त्याचे आयुष्य बदलून गेलं. ग्रामीण चित्रपटांच्या सध्याच्या ट्रेंडमध्ये आपला वेगळा ठसा उमटवणाऱ्या वंटास या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियाद्वारे काहीच दिवसांपूर्वी लाँच करण्यात आला. गुरूकृपा प्रॉडक्शन एन्टरटेन्मेंटच्या अमोल बापूराव लवटे यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. ज्ञानेश्वर यादवराव उमक यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. वंटास ही कथा आहे गौरी आणि आंब्या यांची... उनाडक्या करणारा आंब्या गौरीच्या प्रेमात पडतो आणि तिला मिळवण्यासाठी त्याला काय काय करामती कराव्या लागतात, याची ही 'वंटास' गोष्ट आहे. अजय वरपे, स्नेहल साळुंखे, अक्षय माहूलकर, रमेश वेदपाठक, मृणालिनी रानावरे, मनमोहन माहिमकर, प्रदीप नवले हे कलाकार चित्रपटात दिसणार आहेत. सुदर्शन महामुनी यांनी चित्रपटाची कथा आणि संवाद लेखन केले आहे. हरीश राऊत आणि ज्ञानेश्वर उमक यांनी पटकथा लिहिली आहे. वलय आणि सुदर्शन महामुनी यांनी लिहिलेल्या गीतांना पंकज पडघन यांनी संगीतबद्ध केलं आहे. शैलेश जाधव यांनी कॅमेरामन म्हणून काम पाहिले असून संकलन जागेश्वर ढोबळे यांचे आहे तर कार्यकारी निर्माता म्हणून शैलेंद्र पवार यांनी काम पाहिले आहे.

Also Read : ​वंटास ४ मे पासून संपूर्ण महाराष्ट्रात
 

Web Title: The story of Ramesh, who is part-time job interviewer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.