Stunning...! लंडनच्या रस्त्यावर सखी दिसली ग्लॅमरस लूकमध्ये, पहा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2019 06:30 IST2019-10-08T06:30:00+5:302019-10-08T06:30:00+5:30
'दिल दोस्ती दुनियादारी' या मालिकेमुळे सखी गोखले हे नाव घराघरात पोहोचले.

Stunning...! लंडनच्या रस्त्यावर सखी दिसली ग्लॅमरस लूकमध्ये, पहा फोटो
'दिल दोस्ती दुनियादारी' या मालिकेमुळे सखी गोखले हे नाव घराघरात पोहोचले. या मालिकेतील तिची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. यानंतर ती दिल दोस्ती दोबारा या मालिकेत देखील मुख्य भूमिकेत झळकली.
अभिनेत्री सखी गोखले सध्या लंडनमध्ये शिक्षणासाठी गेली आहे. मात्र तरीही सखी सोशल मीडियाच्या माध्यमातून फॅन्सच्या संपर्कात असते. लंडनमधील एक फोटो सखीने शेअर केला आहे. या फोटोत सखी खूपच ग्लॅमरस दिसते आहे.
सखीचा हा फोटो तिच्या चाहत्यांनादेखील आवडला आहे. त्यांनी लाईक्स आणि कमेंट्सच्या माध्यमातून आपली पसंती दर्शवली आहे.
गेल्या एप्रिल महिन्यात सखी अभिनेता सुव्रत जोशीसोबत लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. २०१५ साली दुनियादारी ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आणि या मालिकेच्या सेटवरच सुव्रत व सखीची ओळख झाली होती.
सखी लंडनमध्ये असते तर सुव्रत मुंबईत असतो. मात्र तोदेखील वेळ मिळेल तेव्हा सखीला भेटण्यासाठी लंडनला जात असतो.
तो तिथे गेल्यावर तिथले फोटो ते दोघं सोशल मीडियावर शेअर करत असतात.
सखी व सुव्रतचे चाहते त्या दोघांना पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहेत.