Subhedar Movie : हातात तलवार, नजरेत धगधगणारी आग; 'सुभेदार'च्या पोस्टरनं वेधलं सर्वांचं लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2023 06:56 PM2023-06-30T18:56:26+5:302023-06-30T18:59:34+5:30

Subhedar Movie : 'सुभेदार' या चित्रपटात अभिनेते अजय पुरकर तानाजी मालुसरे यांची भूमिका साकारणार आहेत.

Subhedar Movie : Sword in hand, fire blazing in sight; The poster of 'Subhedar' caught everyone's attention | Subhedar Movie : हातात तलवार, नजरेत धगधगणारी आग; 'सुभेदार'च्या पोस्टरनं वेधलं सर्वांचं लक्ष

Subhedar Movie : हातात तलवार, नजरेत धगधगणारी आग; 'सुभेदार'च्या पोस्टरनं वेधलं सर्वांचं लक्ष

googlenewsNext

“आधी लगीन कोंढाण्याचं आन मग माझ्या रायबाच" म्हणत दंड थोपटून कोंढाण्यावर चढाई करत, अखेरच्या श्वासापर्यंत लढणाऱ्या सुभेदार नरवीर तान्हाजी मालुसरे हे शिवछत्रपतींच्या योद्ध्यांपैकी महत्त्वाचे नाव! तान्हाजीरावांच्या नावाशिवाय शिवचरित्र पूर्णच होऊ शकत नाही. पण तान्हाजीराव म्हणजे केवळ सिंहगडाची लढाई नव्हे, तर छत्रपतींच्या स्वराज्याची पायाभरणी करणारे आघाडीचे शिलेदार होते. सुभेदार हे मुलकी आणि लष्करी दोन्ही प्रकारचे महत्त्वाचे पद... त्यांच्या अतुलनीय शौर्याबरोबरच त्यांच्या प्रशासकीय पैलूंवर प्रकाश टाकणारा भव्य ऐतिहासिक चित्रपट म्हणजे सुभेदार (Subhedar Movie). नुकताच या चित्रपटाचा पोस्टर लाँच करण्यात आहे. या पोस्टरने सर्वांचं लक्ष वेधून घेतले आहे.

सुभेदार या चित्रपटात अभिनेते अजय पुरकर तानाजी मालुसरे यांची भूमिका साकारणार आहेत. नुकताच अजय पुरकर यांनी त्यांचा सुभेदार या चित्रपटामधील लूकचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यांनी फोटो शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं की, 'शिवाजी राजांचं अन् भगव्याचं रक्षन कराया आमी मराठे छातीचा कोट करून हुबं हाओत...हर हर महादेव !!!' अजय पुरकर यांना तानाजी मालुसरे यांच्या भूमिकेत पाहण्यासाठी प्रेक्षक खूप उत्सुक आहेत. 

पोस्टरला मिळतेय चाहत्यांची पसंती
सुभेदारच्या पोस्टरवर चाहते लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. एका युजरने लिहिले की, देवगनच्या तान्हाजी पेक्षा पूरकरांचा तान्हाजी हा लाख पट सर्वोत्कृष्ट असेल याची खात्री आहे. कारण आता रक्त मराठी आहे. दुसऱ्या युजरने लिहिले की, तानाजीराव नावाचं वादळ येतंय म्हणल्यावर गनिम चार पावलं मागं सरणारचं ना. आणखी एका युजरने म्हटले, आधी पावनखिंड आता सुभेदार.
लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या शिवराज अष्टकातील पाचवे चित्रपुष्प असलेला ‘सुभेदार’ चित्रपट २५ ऑगस्ट २०२३ ला चित्रपटगृहांत झळकणार आहे. 'शिवराज अष्टक'मधील 'फर्जंद', 'फत्तेशिकस्त', 'पावनखिंड' आणि 'शेर शिवराज' चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर ‘सुभेदार’ या पाचव्या चित्रपुष्पासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

Web Title: Subhedar Movie : Sword in hand, fire blazing in sight; The poster of 'Subhedar' caught everyone's attention

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.