​सुबोध भावे आणि राकेश बापट झळकणार चित्रपटात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2017 17:52 IST2017-04-17T12:22:24+5:302017-04-17T17:52:24+5:30

फुगे हा सुबोध भावे आणि स्वप्निल जोशी जोडीचा चित्रपट काहीच महिन्यांपूर्वी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे प्रेक्षकांनी आणि समीक्षकांनी ...

Subodh Bhave and Rakesh Bapat Chhalakan in the film | ​सुबोध भावे आणि राकेश बापट झळकणार चित्रपटात

​सुबोध भावे आणि राकेश बापट झळकणार चित्रपटात

गे हा सुबोध भावे आणि स्वप्निल जोशी जोडीचा चित्रपट काहीच महिन्यांपूर्वी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे प्रेक्षकांनी आणि समीक्षकांनी चांगलेच कौतुक केले होते. या चित्रपटातील सुबोध आणि स्वप्निलच्या केमिस्ट्रीचीदेखील चांगलीच चर्चा झाली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन स्वप्ना वाघमारे जोशी यांनी केले होते. या चित्रपटाच्या यशानंतर स्वप्ना आणखी एक चित्रपटावर काम करत असल्याचे कळत आहे. हा नवा चित्रपट प्रेक्षकांच्या लवकरच भेटीस येणार असून त्यांच्या आगामी चित्रपटातदेखील मराठीतील दोन प्रसिद्ध कलाकार प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.
फुगे या चित्रपटातील सुबोधच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. या चित्रपटातनंतर तो स्वप्ना वाघमारे जाशी यांच्यासोबत पुन्हा एकदा चित्रपटात काम करणार आहे. स्वप्ना यांच्या आगामी चित्रपटात सुबोध प्रमुख भूमिकेत झळकणार असल्याचे कळतेय.
सुबोध आणि स्वप्निलच्या जोडीनंतर प्रेक्षकांना आता सुबोध आणि राकेश बापटची जोडी पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात या दोघांच्या भूमिका काय असणार याबाबत चित्रपटाच्या टीमने मौन राखणेच पसंत केले आहे. पण या दोघांनी चित्रपटाचे चित्रीकरण सुरू केले असल्याचे प्रेक्षकांना कळतेय.
कट्यार काळजात घुसली या चित्रपटानंतर सुबोधने सगळे हिटच चित्रपट दिले आहेत. त्यामुळे त्याच्या चित्रपटाची त्याचे फॅन्स आतुरतेने वाट पाहात असतात तर राकेशने केवळ मराठी चित्रपटांमध्येच नव्हे तर हिंदी मालिकांमध्येदेखील आपले प्रस्थ निर्माण केले आहे. त्यामुळे आता राकेश आणि सुबोध या दोघांची जोडी प्रेक्षकांना एकाच चित्रपटात एकत्र पाहायला मिळणार ही त्यांच्यासाठी पर्वणीच ठरणार आहे. या चित्रपटाचे नाव अद्याप कळले नसले तरी या चित्रपटाची लवकरच घोषणा होणार असल्याची चर्चा आहे.  

Raqesh Vashisth



Web Title: Subodh Bhave and Rakesh Bapat Chhalakan in the film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.