चुकलं असेल तर क्षमा मागतो, पण त्याआधी..., सुबोध भावेनं शेअर केला ‘त्या’ भाषणाचा ‘अनकट’ व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2022 10:20 AM2022-08-03T10:20:22+5:302022-08-03T10:22:07+5:30

Subodh Bhave : मराठमोळा अभिनेता सध्या ‘बस बाई बस’ या नव्या शोमुळे चर्चेत आहे. याशिवाय सध्या त्याच्या एका बेधडक वक्तव्याची चर्चा रंगली आहे. एका कार्यक्रमात सुबोधने राजकीय पार्श्वभूमीवर भाष्य केलं आणि सोशल मीडियावर त्याचीच चर्चा रंगली.

subodh bhave talked about politics gives clarification shared pune speech uncut video | चुकलं असेल तर क्षमा मागतो, पण त्याआधी..., सुबोध भावेनं शेअर केला ‘त्या’ भाषणाचा ‘अनकट’ व्हिडीओ

चुकलं असेल तर क्षमा मागतो, पण त्याआधी..., सुबोध भावेनं शेअर केला ‘त्या’ भाषणाचा ‘अनकट’ व्हिडीओ

googlenewsNext

मराठमोळा अभिनेता  सुबोध भावे  (Subodh Bhave) सध्या ‘बस बाई बस’ या नव्या शोमुळे चर्चेत आहे. याशिवाय सध्या त्याच्या एका बेधडक वक्तव्याची चर्चा रंगली आहे. एका कार्यक्रमात सुबोधने राजकीय पार्श्वभूमीवर भाष्य केलं आणि सोशल मीडियावर त्याचीच चर्चा रंगली.  अनेकांनी सुबोधच्या या वक्तव्याला समर्थन दिलं तर अनेकांवर यावर टीका देखील केली. सुबोधचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला. पण यादरम्यान सुबोध भावेनं एक फेसबुकवर एक पोस्ट शेअर करत यासंदर्भात खुलासा केला आहे.

‘चुकीच्या बातमीनं गोंधळ घातला असून आधी माझा व्हिडीओ बघा आणि मग ठरवा’,असं त्याने या पोस्टमध्ये म्हटलं आहे. इतकंच नाही तर ‘माझं चुकलं असेल तर मी क्षमा मागतो’, असंही सुबोधनं म्हटलं आहे.  सुबोधनं पुण्याच्या त्या भाषणाचा अनकट व्हिडीओ देखील शेअर केला आहे.  

सुबोधची पोस्ट...
नमस्कार,
काल माझ्या एका भाषणाच्या चुकीच्या बातमीने जो काही गोंधळ घातला आहे, त्याचा हा संपूर्ण व्हिडीओ. (कुठेही कट न करत जसाच्या तसा) आपण जे काही आणि ज्या अर्थाने बोलतो त्याची जबाबदारी आपण घ्यावी या मताचा मी आहे. पण जो अर्थच माझ्या बोलण्याचा नव्हता आणि तो जर चुकीच्या पद्धतीने बातमीदार पोचवत असतील तर त्याची संपूर्ण जबाबदारी त्यांची. माझं संपूर्ण भाषण पाहिल्यावर जर तुम्हाला वाटलं की माझं चुकलं तर मी मनापासून क्षमा मागतो. पण त्याआधी एकदा ‘संपूर्ण भाषण’ त्याच्या अर्थासहित बघा तर एकदा...., असं सुबोधने म्हटलं आहे. या पोस्टसोबत सुबोधने भाषणाचा व्हिडीओही शेअर केला आहे.

1 ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त ‘शतसूर्याचे तेज’ या लोकमान्यांच्या जीवनकार्याचा वेध घेणाºया नृत्य-नाटिकेचे आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला संबोधित करताना सुबोधनं महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सुरू असलेल्या परिस्थितीचा खरमरीत समाचार घेतला.  ‘ज्या राजकारण्यांची लायकी नाही, अशांच्या हातात आपण देश उभारणीचे काम दिले आहे’, अशा तीव्र शब्दात सुबोधनं टीका केली.  मात्र त्याच्या या भाषाणाचा अनेकांची चुकीचा अर्थ काढून त्याला ट्रोल केलं आणि गोंधळ घातला असं सुबोधनं म्हटलं आहे.  

Web Title: subodh bhave talked about politics gives clarification shared pune speech uncut video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.