असा आहे 'रेडू'चा गमतीदार ट्रेलर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2018 09:53 AM2018-04-27T09:53:59+5:302018-04-30T10:27:07+5:30

कोकणच्या मातीचा सुगंध आणि रेडूचा नाद लावणारा हा सिनेमा प्रेक्षकांना मे महिन्याच्या गर्मीत विनोदाचा थंडावा घेऊन येणार हे निश्चित.

Such is the fantastic trainer of Redu | असा आहे 'रेडू'चा गमतीदार ट्रेलर

असा आहे 'रेडू'चा गमतीदार ट्रेलर

googlenewsNext
लवणी भाषेचा तडका आणि रेडियोची धम्माल घेऊन येणाऱ्या 'रेडू' सिनेमाचा सोशल नेट्वर्किंग साईटवर नुकताच गमतीदार ट्रेलर लाँच करण्यात आला. ६०-७० च्या दशकातला 'रेट्रो' काळ गाजवणाऱ्या रेडियोची रंजक सफर या ट्रेलरमधून घडून येत असल्यामुळे, हा सिनेमा अनेकांसाठी नाॅस्टेलजीक ठरणार आहे. लँडमार्क फिल्मच्या विधि कासलीवाल प्रस्तूत आणि नवल फिल्म्सचे नवलकिशोर सारडा निर्मित, ब्लिंक मोशन पिक्चर प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सहयोगाने 'रेडू' हा सिनेमा, येत्या १८ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.सागर छाया वंजारी दिग्दर्शित आणि संकलित 'रेडू' या सिनेमात मराठी - मालवणी भाषेचा सर्वाधिक वापर केला गेला असल्याचे पाहायला मिळते.'रेडू'च्या माध्यमातून सामान्य माणसाचे भावविश्व या सिनेमात मांडटडण्यात आले आहे.रेडूवर अमाप प्रेम करणाऱ्या प्रमुख पात्राची भूमिका यात शशांक शेंडे यांनी वठवली असून, त्यांच्या विनोदी अभिनयाची अनोखी झलकदेखील या सिनेमाच्या ट्रेलरमधून आपल्याला पाहायला मिळते. जिवापाड जपलेला हा रेडू जेव्हा हरवतो, तेव्हा काय होते? अखेर तो सापडतो का? हे सारे काही या सिनेमात पाहायला मिळणार आहे. तसेच 'रेडू' विषयी ग्रामस्थांमध्ये असणारे कुतूहल आणि त्यामुळे उद्भवणारे गमतीदार प्रसंग यात दिसून येत असल्यामुळे, हा सिनेमा प्रेक्षकांचे भरघोस मनोरंजन करणार आहे. संजय नवगिरे यांच्या लेखणीतून सादर झालेल्या या मालवणी भाषेतील सिनेमाचे मंगेश गाडेकर यांनी छायाचित्रण केले आहे.शशांक शेंडे बरोबरच छाया कदम ही ताकदीची अभिनेत्रीदेखील या सिनेमात पाहायला मिळणार आहे.कोकणच्या मातीचा सुगंध आणि रेडूचा नाद लावणारा हा सिनेमा प्रेक्षकांना मे महिन्याच्या गर्मीत विनोदाचा थंडावा घेऊन येणार हे निश्चित.



'रेडू' असे गमतीशीर नाव असलेला एक मराठी सिनेमा लवकरच येत आहे. मात्र या 'रेडू'चा नेमका अर्थ काय? रेड्याला रेडू म्हंटले असेल का... किंवा आणखीन काही? असे अनेक प्रश्न लोकांना या हटके नावामुळे पडत आहे. 'रेडू'च्या अर्थाचे अनेक तर्कवितर्क मराठीतील काही कलाकरांनीदेखील लावायला सुरुवात केली आहे. ज्यात प्रिया बापटच्या मते रेडू म्हणजे रेड्याचे पिल्लू आहे, तर सारंग साठ्येने रेडूचा 'रेडू स्टेडू गो' असा मजेशीर अर्थ सांगितला. रसिका सुनील 'रेडू' एक प्राण्याचे नाव असेल असा अंदाज व्यक्त करते, तर भाऊ कदमने रेडूला रेडा म्हंटले आहे. इतकेच नव्हे तर अमेय वाघने थेट 'रेडीमेड' आणि 'ड्युप्लेक्स'ला एकत्र करत 'रेडू' असा निष्कर्ष काढला. खरं तर यांपैकी कोणालाच 'रेडू'चा नेमका अर्थ सांगता आला नाही. 'रेडू' नावाविषयी कलाकारांनी केलेल्या या भन्नाट तर्कवितर्कानंतर, अखेरीस 'रेडू' चा खरा अर्थ या सिनेमाच्या टीझर पोस्टरद्वारे स्पष्ट करण्यात आला. सोशल नेट्वर्किंग साईटवर नुकत्याच  प्रदर्शित  करण्यात आलेल्या या सिनेमाच्या टीझर पोस्टरमध्ये रेडियो दिसत असल्यामुळे, 'रेडू' म्हणजेच 'रेडियो' हे लोकांना समजले आहे.

Web Title: Such is the fantastic trainer of Redu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.