सुकन्या कुलकर्णी यांचा भाऊ देखील आहे मोठा अभिनेता व दिग्दर्शक; वाचा, त्याच्याबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2021 07:00 AM2021-08-05T07:00:00+5:302021-08-05T07:00:02+5:30

अशी निःस्वार्थी नाती आजकाल खूप कमी बघायला मिळतात... ; ‘आभाळमाया’ याच मालिकेच्या सेटवर सुकन्या यांना त्यांना भाऊ भेटला होता.

Sukanya Kulkarni mone's brother sanjay jadhav is also a big actor and director; Read on, know about him | सुकन्या कुलकर्णी यांचा भाऊ देखील आहे मोठा अभिनेता व दिग्दर्शक; वाचा, त्याच्याबद्दल

सुकन्या कुलकर्णी यांचा भाऊ देखील आहे मोठा अभिनेता व दिग्दर्शक; वाचा, त्याच्याबद्दल

googlenewsNext
ठळक मुद्देसंजय जाधव  केमिकल इंजिनिअर आहेत. त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात सहाय्यक दिग्दर्शकाच्या रुपात केली.

सुकन्या कुलकर्णी मोने  (Sukanya Kulkarni Mone) हे मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील एक मोठे नाव. आभाळमाया, चूक भूल द्यावी घ्यावी,जुळून येती रेशीमगाठी, जिगर, सरफरोश, सरकारनामा, परवाने, दुर्गा झाली गौरी अशा अनेक मालिका व सिनेमांमध्ये सुकन्या यांनी साकारलेल्या भूमिकांना तोड नाही. अभिनयाची कारकिर्द सुरू असतानाच सुकन्या संजय मोने यांच्याशी विवाहबद्ध झाल्यात.
‘आभाळमाया’ या मालिकेतील सुकन्या यांचा अभिनय अफलातून होता. ही मालिका प्रचंड लोकप्रिय झाली होती. या मालिकेनंतरच मराठीमध्ये ख-या अर्थाने मालिका बनवण्याचा ट्रेंड सुरू झाला, असे म्हटले तरी चालेल. याच मालिकेच्या सेटवर सुकन्या यांना त्यांना भाऊ भेटला होता.

होय, आज आम्ही त्यांच्या याच भावाबद्दल सांगणार आहोत. या भावाचे नाव आहे संजय जाधव. होय, संजय जाधव (Sanjay Jadhav) व सुकन्या कुलकर्णी हे जरी सख्खे भाऊ-बहिण नसले तरी दोघांचं नाते खूप खास आहे. सुकन्या प्रत्येक रक्षाबंधन आणि भाऊबीज संजय जाधव यांच्यासोबतच साजरी करतात.
 ‘आभाळमाया’ या मालिकेचे दिग्दर्शन विनय आपटे यांनी केले होते. मालिकेचे चित्रीकरण सुरू असताना या मालिकेत विनय आपटे यांना प्रसिद्ध दिग्दर्शक निर्माते संजय जाधव यांनी देखील मदत केली होती. याच मालिकेच्या सेटवर संजय जाधव आणि सुकन्या  यांची ओळख झाली होती. काही दिवसांत दोघांची मैत्री जमली. त्यानंतर सुकन्या यांनी संजय याला आपला भाऊ मानले आणि तेव्हापासून संजय जाधव हे सुकन्या यांच्या कडून राखी बांधून घेतात. दोघांचे नाते हे सख्या बहिण भावाप्रमाणेच आहे. 

आई शप्पथ, सातच्या आत घरात अशा सुपरहिट सिनेमांचे छायाचित्रण,  चेकमेट साठी कथालेखन, पटकथालेखन, छायाचित्रण आणि दिग्दर्शन अशा चौकोनी भूमिका साकारणारे आणि  दुनियादारी या ब्लॉकबस्टर सिनेमाचे दिग्दर्शन करणारे संजय जाधव  केमिकल इंजिनिअर आहेत. त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात सहाय्यक दिग्दर्शकाच्या रुपात केली. मराठीतील प्रसिद्ध छायाचित्रणकार आणि दिग्दर्शक म्हणून त्यांची ख्याती आहे.  

Web Title: Sukanya Kulkarni mone's brother sanjay jadhav is also a big actor and director; Read on, know about him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.