सुकन्या मोने यांना लग्नानंतर सासू सासऱ्यांकडून मिळाली अशी वागणूक; म्हणाल्या - 'त्यांनी मला कधीच मुलीसारखं...'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2023 05:11 PM2023-10-29T17:11:55+5:302023-10-29T17:20:07+5:30

अलिकडेच सुकन्या मोने आणि संजय मोने या जोडीने 'लोकमत फिल्मी'ला मुलाखत दिली.

Sukanya Mone talk about Mother In Law and Marriage in Lokmat Filmy interview | सुकन्या मोने यांना लग्नानंतर सासू सासऱ्यांकडून मिळाली अशी वागणूक; म्हणाल्या - 'त्यांनी मला कधीच मुलीसारखं...'

सुकन्या मोने यांना लग्नानंतर सासू सासऱ्यांकडून मिळाली अशी वागणूक; म्हणाल्या...

मराठी अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी- मोने म्हणजे मराठी सिनेसृष्टीतील एक दिलखुलास व्यक्तिमत्व. अतिशय गोड अभिनय आणि नृत्याची आवड असलेल्या सुकन्या मोने यांचा नुकताच प्रदर्शित झालेला 'बाईपण भारी देवा' सिनेमा सुपरहिट झाला. अलिकडेच सुकन्या मोने आणि संजय मोने या  जोडीने 'लोकमत फिल्मी'ला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी लग्नानंतर सासू सासऱ्यांकडून मिळालेल्या प्रेमाविषयी सांगितलं.

लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत सुकन्या म्हणाल्या, 'माझ्या सासू-सासऱ्यांनी मला कधीच मुलीसारख मानलं नाही. तर मुलगीच म्हणूनच वागणूक दिली. खरंतर त्यांना दोन मुली असून सुद्धा माझं खूप कौतुक केलं. माझं लग्न झाल्यानंतर जेव्हा माझा पहिला वाढदिवस मोने कुटुंबात झाला. तेव्हा सासूबाईंनी गुपचूप मला सरप्राइज द्यायचं म्हणून रात्री जागून माझ्यासाठी ओल्या नारळाच्या करंज्या केल्या होत्या. हे मी आयुष्यात कधीच विसरू शकतं नाही'.

मुलाखतीत पुढे त्यांनी सांगितलं, लग्न झाल्यानंतर मला पहिल्यांदा ‘सरकारनामा’साठी फिल्मफेअर मिळाला होता. तेव्हा माझ्या सासूबाई छान शालू नेसून आणि माझे सासरे थ्री पीस सूट घालून दोघंही माझ्याबरोबर फिल्मफेअर अवॉर्ड घ्यायला आले होते. इतकं सुनेचं कौतुक कोण करतं? हे निस्वार्थ प्रेम होतं. 

सुकन्या मोने यांनी 'या सुखांनो या', 'आभाळमाया', 'जुळून येती रेशीमगाठी' अशा अनेक मराठी मालिकांमध्ये काम केलं. त्यांनी आपल्या दमदार अभिनयाने मराठी मनोरंजनसृष्टीत वेगळा ठसा उमटवला आहे.   ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटानंतर त्या ‘इंद्रधनुष्य’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.

Web Title: Sukanya Mone talk about Mother In Law and Marriage in Lokmat Filmy interview

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.