Sulochana Latkar : 'मां...!' अखेर ती वाईट बातमी आली…; सुलोचना दीदींच्या निधनाने बिग बी शोकाकुल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2023 01:21 PM2023-06-05T13:21:33+5:302023-06-05T13:23:40+5:30
अनेक चित्रपटांत सुलोचना दीदी यांनी अमिताभ यांच्या आईची भूमिका पार पाडलीय, त्यांच्या निधनामुळे बिग बींना धक्का बसला आहे.
अनेक चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्या आईंची भूमिका साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दिदींचं रविवारी ४ जूनला निधन झालं. अनेक चित्रपटांत त्यांनी अमिताभ यांच्या आईची भूमिका पार पाडलीय. रेश्मा और शेरा, मजबूर, मुकद्दर का सिकंदर या सिनेमात त्यांनी अमिताभ यांच्या आईची भूमिका निभावली होती. सुलोचना दीदी यांच्या जाण्याचा बिग बींना मोठा धक्का बसला आहे. सुलोचना दीदी यांचे पार्थिव शरीर प्रभादेवी येथील त्यांच्या निवासस्थानी अंतिम दर्शनासाठी ठेवलं जाईल. संध्याकाळी साडेपाच वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील.
सोशल मीडियाच्या माध्यमातून सुलोचना दीदींना विविध क्षेत्रातील मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. अमिताभ बच्चन यांनी ब्लॉगच्या माध्यामातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. आपण चित्रपटसृष्टीतील एका महान कलाकार असलेल्या सुलोचना जी यांना गमावले आहे. त्यांनी माझ्या अनेक सिनेमात दयाळू आणि काळजी घेणाऱ्या आईची भूमिका साकारली होती. त्या गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. त्या आपल्याला सोडून स्वर्गीय निवासासाठी निघून गेल्या.’
Sulochana
— Film History Pics (@FilmHistoryPic) July 30, 2019
(1974) Majboor -Amitabh Bachchan
(1968) Aadmi -Dilip Kumar
(1966) Aaye Din Bahaar Ke - Dharmendra
(1959) Do Ustad -Raj Kapoor pic.twitter.com/I5W6W8PbkN
#RIP Sulochana Latkar passed on aged 94 today.
— Film History Pics (@FilmHistoryPic) June 4, 2023
Born near Belgaum, well-known as the screen mother. She featured in 300+ Hindi/Marathi films. pic.twitter.com/HdKnp2KcI4
अमिताभ यांनी पुढे लिहिले, 'मी त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून होतो, त्यांच्या कुटुंबाच्या संपर्कात देखील होतो... आणि अखेर ती वाईट बातमी आली.
दरम्यान सुलोचना दीदींनी यांच्या निधनावर धर्मेंद्र यांनी ही शोक व्यक्त करत ट्विट केले आहे. सुलोचना लाटकर यांच्यासोबतच्या एका चित्रपटातील फोटो शेअर केला आहे. ज्यात सुलोचना दीदींनी धर्मेंद्र यांच्या आईची भूमिका केली होती. हा फोटो ट्विट करत त्यांनी लिहिले, 'खूप आठवण येईल...अगणित चित्रपटांमध्ये...ती माझी आई होती.'
Bahut yaad aayengi …. unginnat filmon mein……ye meri Maa theyn🙏 pic.twitter.com/1y9sqq21LO
— Dharmendra Deol (@aapkadharam) June 4, 2023
यासोबतच त्यांनी आणखी एक ट्विट शेअर केले आहे, ज्यामध्ये त्यांनी लिहिले आहे की, 'मी नेहमी तिच्या तब्येतीबद्दल विचारपूस करायचो... दुःख आहे की त्या आता आपल्यात नाही...