सुमेध मुदगलकर पहिल्यांदाच दिसणार रोमँटिक म्युझिक अल्बममध्ये
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2018 07:15 IST2018-10-06T15:45:45+5:302018-10-08T07:15:00+5:30
सध्या हिंदी टेलिविजनविश्वात 'राधा-कृष्ण' या पौराणिक मालिकेतून कृष्णाचा भूमिका साकारत असलेला चॉकलेट बॉय सुमेध मुदगलकर लवकरच एका म्युझिक अल्बममध्ये झळकणार असल्याचं समजतंय.

सुमेध मुदगलकर पहिल्यांदाच दिसणार रोमँटिक म्युझिक अल्बममध्ये
सध्या हिंदी टेलिविजनविश्वात 'राधा-कृष्ण' या पौराणिक मालिकेतून कृष्णाचा भूमिका साकारत असलेला चॉकलेट बॉय सुमेध मुदगलकर लवकरच एका म्युझिक अल्बममध्ये झळकणार असल्याचं समजतंय.
“व्हेंटिलेटर, मांजा आणि बकेट लिस्ट या चित्रपटांमध्ये सुमेधाने भूमिका साकारल्या आहे आणि तो लोकप्रिय देखील झाला. एकही रोमँटिक फिल्म न करताही आपल्या देखण्या चेहऱ्यामुळे तो आज लाखो तरूणींच्या गळ्यातील ताईत बनला आहे. आता तो पहिल्यांदा एका म्युझिक अल्बममध्ये दिसणार आहे आणि तो ही रोमँटिक अंदाजात.”
सुमेध कृष्णाच्या भूमिकेत दिसल्यानंतर त्याच्या आता रोमँटिक अंदाजात प्रेक्षकांच्यासमोर येणार आहे. सुमेधने डान्स आणि अभिनय यांची कुठलीही फॉर्मल ट्रेनिंग घेतलेली नाही. सुमेधला आधीपासूनच अभिनय क्षेत्रात यायचे होते. त्यानंतर त्यांने डान्सची देखील प्रॅक्टिस करायला सुरूवात केली. मग त्याला आवड लागली आणि आॅफर्सही येत गेल्या. इंडस्ट्रीत कुणीही गॉडफादर नसल्याने त्याला इतरांना प्रमाणे स्ट्रगल करावाच लागला.
सुमेध साकारत असलेली कृष्णाची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. सुरूवातीपासूनच पौराणिक मालिकांना रसिकांचे प्रचंड प्रेम मिळत आले आहे. मालिकेप्रमाणे त्यातील व्यक्तिरेखा रसिकांच्या आजही लक्षात असतात. पौराणिक विषयांवरील मालिका हा टीव्ही मालिकांमधील नवा कल असून त्या प्रेक्षकांमध्ये भरपूर लोकप्रियही होतात. आता ‘स्टार भारत’ वाहिनीवरही भारतीय संस्कृतीतील अजरामर प्रेम कहाणीचे- राधा-कृष्णाच्या प्रेमकथेचे- भव्य सादरीकरण होत आहे. सिद्धार्थ कुमार तिवारी यांची निर्मिती असलेल्या ‘राधा-कृष्ण’ नावाच्या या मालिकेत दिग्गज कलावंतांची मांदियाळी पाहायला मिळत आहे.