सुमीत राघवनने कही दूर... हे गाणे गात आनंद या चित्रपटामधील दिग्गजांना वाहिली आदरांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2021 16:49 IST2021-03-12T16:40:42+5:302021-03-12T16:49:41+5:30
सुमीतने कही दूर जब... हे गाणे गातानाचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

सुमीत राघवनने कही दूर... हे गाणे गात आनंद या चित्रपटामधील दिग्गजांना वाहिली आदरांजली
‘आनंद’ हा प्रचंड गाजलेला सिनेमा आहे. राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन या सुपरहिट जोडीच्या अभिनयाने सजलेल्या 70 च्या दशकातील या सुपरहिट सिनेमाच्या आठवणी आजही सिनेप्रेमींच्या मनात जिवंत आहेत. या चित्रपटाला आज 50 वर्षं पूर्ण झाली.
आनंद या चित्रपटासाठी अनेक दिग्गज मंडळी एकत्र आली होती. या चित्रपटात राजेश खन्ना, अमिताभ बच्चन, सुमीता सन्याल, रमेश देव, सीमा देव यांसारख्या कलाकारांनी मुख्य भूमिका साकारली होती तर या चित्रपटाचे दिेग्दर्शन हृषिकेश मुखर्जी यांनी केले होते. या चित्रपटाला संगीत सलील चौधरी यांनी दिले होते तर चित्रपटातील गाणी मुकेश, मन्ना डे, लता मंगेशकर यांनी गायली होती. या चित्रपटाला 50 वर्षं पूर्ण झाले असल्याने या चित्रपटातील दिग्गजांना सुमीत राघवनने गाणे गात आदरांजली वाहिली आहे.
सुमीतने कही दूर जब... हे गाणे गातानाचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या गाण्याद्वारे त्याने आदरांजली वाहिली आहे. हा त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून काहीच तासांत नऊ हजाराहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.
आनंद या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर प्रचंड गल्ला जमवला होता. या चित्रपटाला आज अनेक वर्षं झाले असले तरी या चित्रपटाची लोकप्रियता थोडी देखील कमी झालेली नाही. या चित्रपटातील राजेश खन्ना यांचे काम तर प्रेक्षकांना प्रचंड आवडले होते. राजेश खन्ना यांची बाबूमोशाय बोलण्याची स्टाईल तर प्रेक्षकांना प्रचंड भावली होती. या चित्रपटासाठी राजेश खन्ना यांना पुरस्कार देखील मिळाले होते. या चित्रपटातील अनेक गाणी आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत.