सुमित राघवन म्हणतोय, 'राधे राधे...'; काय आहे ही नवीन भानगड

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2019 06:30 AM2019-05-27T06:30:00+5:302019-05-27T06:30:00+5:30

'वेलकम होम' हा चित्रपट १४ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Sumit Raghavan says, 'Radhe Radhe ...'; What is this new issue? | सुमित राघवन म्हणतोय, 'राधे राधे...'; काय आहे ही नवीन भानगड

सुमित राघवन म्हणतोय, 'राधे राधे...'; काय आहे ही नवीन भानगड

googlenewsNext

अभिनेता सुमित राघवन हा उत्तम गायक आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे. त्याने संगीत नाटकातही काम केले आहे. मात्र पहिल्यांदाच त्याने चित्रपटातही गाणे गायले आहे. 'वेलकम होम' या चित्रपटात सुमितने 'राधे राधे' हे गाणे गायले असून, विशेष म्हणजे, बंगाली शैलीत असलेले गाणे सुमितने कोणत्याही वाद्यांच्या साथ संगतीविना गायले आहे. १४ जूनला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 

'वेलकम होम' चित्रपटाची निर्मिती अभिषेक सुनील फडतरे, विनय बेळे, अश्विनी सिधवानी, दीपक कुमार भगत यांनी केली आहे. तर चित्रपटात मृणाल कुलकर्णीसह सुमित राघवन, स्पृहा जोशी, सुबोध भावे, जितेंद्र जोशी, डॉ. मोहन आगाशे, प्रसाद ओक, उत्तरा बावकर, सेवा चौहान, सिद्धार्थ मेनन, मिलिंद फाटक, इरावती हर्षे, दीपा श्रीराम, अश्विनी गिरी, रेणुका दफ्तरदार, श्रुती अत्रे, शाल्व किंजवडेकर, प्रांजली श्रीकांत अशी उत्तम स्टारकास्ट आहे.

चित्रपटाचे लेखन सुमित्रा भावे यांचे असून, सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांनी दिग्दर्शन केले आहे. पार्थ उमराणी यांनी संगीत, सुनील सुकथनकर यांनी गीतलेखन, मोहित टाकळकर यांनी संकलन, धनंजय कुलकर्णी यांनी छायांकन, तृप्ती चव्हाण यांनी कला दिग्दर्शन, साकेत कानेटकरने पार्श्वसंगीत केले आहे.  

'चित्रपटात गाण्याची दोन व्हर्जन्स आहेत. त्यातले एक व्हर्जन मला गाण्याची संधी मिळाली. अत्यंत श्रवणीय असे हे गाणं आहे. या गाण्याचे दुसरे व्हर्जन चित्रपटात पार्श्वगीत म्हणून येते. या गाण्यामुळे पहिल्यांदाच चित्रपटात गाणे गाता आले,' असे सुमित म्हणाला.

'चित्रपटात माझी सुरेश नावाची व्यक्तिरेखा आहे. खूप छान प्रकारे ही व्यक्तिरेखा लिहिली गेली आहे. एका दिवसात घडणारी ही गोष्ट आहे. सुमित्रा भावे-सुनील सुकथनकर यांच्यासह, मृणाल कुलकर्णी, डॉय मोहन आगाशे, उत्तरा बावकर यांच्यासारख्या कलाकारांसह काम करण्याची संधी मिळाली. हा चित्रपट म्हणजे खूप छान अनुभव होता.' असेही सुमितने सांगितलेे.

Web Title: Sumit Raghavan says, 'Radhe Radhe ...'; What is this new issue?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.