पहिल्याच भेटीत सुनील बर्वेंना मिळाला होता नकार; अखेर अशी झाली अपर्णा त्यांची अर्धांगिनी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2023 09:55 AM2023-10-03T09:55:22+5:302023-10-03T09:55:44+5:30

Sunil barve: सुनील बर्वेशी लग्न व्हावं अशी त्या काळी अनेक तरुणींची इच्छा होती. मात्र, इतक्या देखण्या अभिनेत्याला एका मुलीने चक्क  नकार दिला होता.

sunil-barve-birthday-know-the-actor-love-story-with-wife-aparna-barve | पहिल्याच भेटीत सुनील बर्वेंना मिळाला होता नकार; अखेर अशी झाली अपर्णा त्यांची अर्धांगिनी

पहिल्याच भेटीत सुनील बर्वेंना मिळाला होता नकार; अखेर अशी झाली अपर्णा त्यांची अर्धांगिनी

googlenewsNext

मराठी सिनेइंडस्ट्रीतला सगळ्यात देखणा नट म्हणून आजही लोकप्रिय असलेला अभिनेता म्हणजे सुनील बर्वे. मराठीसह हिंदी, गुजराथीमध्ये काम करणाऱ्या सुनील बर्वे (Sunil barve) यांची त्याकाळी तुफान क्रेझ होती. यात खासकरुन त्यांचा फिमेल फॅनफॉलोअर्स जास्त होता. सुनील बर्वेशी लग्न व्हावं अशी त्या काळी अनेक तरुणींची इच्छा होती. मात्र, इतक्या देखण्या अभिनेत्याला एका मुलीने चक्क  नकार दिला होता. परंतु, या मुलीच्या प्रेमात वेड्या झालेल्या सुनील बर्वे यांनी तिचा पिच्छा सोडला नाही. अथक प्रयत्न करुन शेवटी त्यांनी तिचं मन जिंकलं आणि तिच्याशी लग्न केलं. म्हणूनच, आज सुनील बर्वे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांची लव्हस्टोरी जाणून घेऊयात.

मुंबईतील पाटकर कॉलेजमध्ये सुनील बर्वे यांचं शिक्षण झालं. याच कॉलेजमध्ये जवळ असलेल्या विश्वास या हॉटेलमध्ये सुनील बर्वे आणि अपर्णा यांची पहिली नजरानजर झाली. पाटकर कॉलेजमध्ये असल्यामुळे सुनील बर्वे वरचेवर विश्वास हॉटेलमध्ये जायचे. याच हॉटेलमध्ये अपर्णा तिच्या मैत्रिणीचा वाढदिवस साजरा करायला आली होती. यावेळी पहिल्यांदाच सुनील यांनी अपर्णा यांना पाहिलं. विशेष म्हणजे अपर्णा यांच्या हातात त्यांच्या नावाचं ब्रेसलेट होतं. हे ब्रेसलेट पाहून सुनील यांना त्यांचं नाव कळलं होतं.

अपर्णाला पाहिल्यावर सुनील बर्वे यांनी तिच्याशी बोलायचा प्रयत्न केला. मात्र, तिने थेट नकार दिला. मात्र, या नकारानंतर सुनील बर्वे यांनी अपर्णाशी मैत्री वाढवायचा प्रयत्न केला. या दोघांची छान मैत्री झाली आणि कालांतराने त्या मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं.

दरम्यान, सुनील आणि अपर्णा यांच्या लग्नाला आता ३० वर्षांपेक्षा जास्त काळ झाला आहे. या दोघांना सानिका आणि अर्थव ही दोन मुलं असून सानिकाचं लग्न सुद्धा झालं आहे. सुनील बर्वे यांचं नाव आजही मराठी कलाविश्वात आदराने घेतलं जातं. त्यांनी 'आई', 'गोजिरी', 'जमलं हो जमलं', 'तू तिथे मी', 'लपंडाव', 'अस्तित्व', 'लग्नाची बेडी', 'झोपी गेलेला जागी झाला', 'श्रीयुत गंगाधर टिपरे', 'सहकुटुंब सहपरिवार' यांसारख्या अनेक नाटक, मालिका, सिनेमांमध्ये काम केलं आहे.

Web Title: sunil-barve-birthday-know-the-actor-love-story-with-wife-aparna-barve

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.