11वर्षांच्या सनीने पटकावला 'न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिवल'मध्ये सर्वोत्कृष्ट बाल कलाकारचा पुरस्कार!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2019 10:43 AM2019-05-16T10:43:32+5:302019-05-16T10:49:32+5:30
मुंबईतल्या कलिना भागातील स्लममध्ये राहणाऱ्या 11 वर्षीय सनी पवार पुन्हा एकदा परदेशात डंका पिटला. सनीने19 व्या न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये त्याला सर्वोत्कृष्ट बाल कलाकारचा अॅवॉर्ड जिंकला आहे.
मुंबईतल्या कलिना भागातील स्लममध्ये राहणाऱ्या 11 वर्षीय सनी पवार पुन्हा एकदा परदेशात डंका पिटला. सनीने 19 व्या न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये सर्वोत्कृष्ट बाल कलाकारचा अॅवॉर्ड जिंकला आहे. चिप्पा सिनेमातील भूमिकेसाठी त्याला हा पुरस्कार देण्यात आला आहे. सनीने यापूर्वी ऑस्ट्रेलिअन दिग्दर्शक गार्थ डेव्हिस यांच्या २०१६मधील ‘लायन’ या हॉलिवूडपटात देव पटेलच्या लहानपणीची भूमिका साकारली आहे.
Sunny Pawar: I am very happy. This is all due to my parents. I want to be a big actor like Rajinikanth and want to make my parents proud. I want to work in both Bollywood and Hollywood. (15.05.2019) pic.twitter.com/Exyzgzmyql
— ANI (@ANI) 16 May 2019
हा अॅवॉर्ड जिंकल्यानंतर सनी म्हणाला, ''मला हा पुरस्कार मिळाल्याने मी खूप आनंदी आहे. याचे सारे श्रेय माझ्या आई-वडिलांना जाते. मला रजनीकांत यांच्यासारखा मोठा कलाकार व्हायचं आहे तसेच आई-वडिलांना अभिमान वाटेल अशी कामगिरी मला करायची आहे. मला बॉलिवूड आणि हॉलिवूड दोन्हीकडे काम करायची इच्छा आहे.''
Mumbai: 11-yr-old Sunny Pawar, a resident of Kunchi Kurve Nagar's slum area near Kalina, has won the Best Child Actor award at the 19th New York Indian Film Festival 2019 for the film 'Chippa'. He had also acted in Australian Director Garth Davis' 2016 film 'Lion'. (15.05.2019) pic.twitter.com/8It795zzTu
— ANI (@ANI) 16 May 2019
चिप्पा ही एका मुलाची हृदयस्पर्शी कथा आहे, ज्याला त्याच्या दहाव्या वाढदिवसाला दीर्घकाळापासून दूर असलेल्या त्याच्या वडिलांचे पत्र मिळते. तो आपले रस्त्यावरील घर सोडून काही आणखी गोष्टींचा शोध घेण्याचे ठरवतो. चित्रपट एका रात्रीमध्ये घडलेल्या घटनांना सादर करतो. यामध्ये चिप्पाने त्याच्या वडिलांशी असलेल्या बंधांचा शोध घेण्यासाठी केलेल्या सुंदर व घटनापूर्ण प्रवासाचा समावेश आहे. सनीसोबत चंदन रॉय सन्याल, मसूद अख्तर, सुमीत ठाकूर आणि माला मुखर्जी यांच्याही या चित्रपटात महत्वाच्या भूमिका आहेत.