​ राजनमध्ये सनीचे आयटम साँग?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2016 02:37 PM2016-12-12T14:37:08+5:302016-12-13T11:13:18+5:30

राजन या चित्रपटाची सध्या सिनेइंडस्ट्रीमध्ये चांगलीच चर्चा रंगत आहे. या चित्रपटामध्ये राजनची भूमिका अभिनेता संतोष जुवेकर करणार आहे. हा ...

Sunny's item song in Rajan? | ​ राजनमध्ये सनीचे आयटम साँग?

​ राजनमध्ये सनीचे आयटम साँग?

googlenewsNext
जन या चित्रपटाची सध्या सिनेइंडस्ट्रीमध्ये चांगलीच चर्चा रंगत आहे. या चित्रपटामध्ये राजनची भूमिका अभिनेता संतोष जुवेकर करणार आहे. हा चित्रपट छोटा राजनच्या आयुष्यावर आधारीत असल्याचे देखील बोलले जात आहे. परंतू या गोष्टीला साफ नकार देत संतोषने हा चित्रपट राजन या मुलाच्या आयुष्यावर आधारीत असल्याचे सांगितले होते. सध्या या चित्रपटासाठी तो चांगलीच मेहनत घेत असल्याचे देखील दिसतेय. हा चित्रपट फक्त अ‍ॅक्शन पर्यंत मार्यादित नसुन यामध्ये एेंटरटेनमेंट, मसाला आणि प्रेमकथा देखील प्रेक्षकांना दिसणार असल्याचे संतोषने सांगितले होते. आता या चित्रपटा संदर्भात वेगळ््याच चर्चा रंगू लागल्या आहेत. या सिनेमात एक आयटम साँग असणार आहे. आणि या आयटम साँग मध्ये आपल्याला हॉट सनी लिओनीचे जलवे पाहायला मिळणार असल्याचे सध्या बोलले जातेय. सनी या चित्रपटातून मराठीत पहिल्यांदाच आयटम साँग करणार आहे. लवकरच ती एका वेगळ््या लुकमध्ये प्रेक्षकांना या चित्रपटातील एका गाण्यात ठुमके लगावताना दिसणार आहे. सनीने आता पर्यंत अनेक हिंदी चित्रपटांमध्ये आयटम नंबर केले आहे. तिची अनेक गाणी सुपरहिट देखील झाली आहेत. सनीच्या कातिलाना अदा पाहण्यासाठी आता तिचे मराठमोळे चाहते देखील उत्सुक असणार यात काही शंकाच नाही. या चित्रपटात ती आपल्याला जर नऊवारी मध्ये लावणी करताना दिसली तरी आश्चर्य वाटायला नको. राजन या चित्रपटाचे शूटिंग लवकरच सुरु होणार आहे. मुंबईतील काही ठिकाणी , चाळींमध्ये, वास्तववादी ठिकाणी या सिनेमाचे चित्रीकरण होणार असल्याचे कळतेय. परंतू सध्या तरी सनी लिओनच्या आयटम साँगमुळे राजनची जास्त चर्चा होऊ लागली आहे हे तितकेच खरे. 

Web Title: Sunny's item song in Rajan?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.