Super Hot हिना पांचाळने शेअर केला क्लीवेज फोटो, सर्वत्र होतेय तिचीच चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2022 13:30 IST2022-03-29T13:30:24+5:302022-03-29T13:30:53+5:30
हिना पांचाळ (Heena Panchal) हिने सोशल मीडियावर क्लीवेजवाला फोटो शेअर केला आहे. या फोटोची सर्वत्र खूप चर्चा होताना दिसत आहे.

Super Hot हिना पांचाळने शेअर केला क्लीवेज फोटो, सर्वत्र होतेय तिचीच चर्चा
बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा(Malaika Arora)शी साधर्म्य असणारी हिना पांचाळ (Heena Panchal) बिग बॉस मराठी (Bigg Boss Marathi 2)च्या दुसऱ्या पर्वात भलतीच भाव खाऊन गेली होती. बिग बॉसमुळे खऱ्या अर्थाने हिना खूप चर्चेत आली होती. ती आपल्या फॅन्सना कधीच निराश करत नाही. दिवसागणिक हटके स्टाइलिश आणि तितकेच फॅशनेबल फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते. दरम्यान हिना पांचाळ हिने सोशल मीडियावर क्लीवेजवाला फोटो शेअर केला आहे. या फोटोची सर्वत्र खूप चर्चा होताना दिसत आहे.
अभिनेत्री हिना पांचाळ हिने इंस्टाग्रामवर क्लीवेजवाला फोटो शेअर केला आहे. या फोटोत तिने पिंक रंगाचा लेहंगा परिधान केला आहे. यात तिने डायमंडचा नेकलेस परिधान केला आहे. या फोटोत ती खूपच हॉट दिसते आहे. तिच्या या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहे. तिचे हे फोटो व्हायरल होताना दिसत आहे.
हिना पांचाळ ही साउथ सिनेइंडस्ट्रीतही काम करते त्यामुळे तिकडे तिची लोकप्रियता खूप आहे. पण विशेष बाब म्हणजे हिनाचा चेहरा बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराशी मिळताजुळता असल्यामुळे मलायकाची ‘Look-Alike’ म्हणून हिना ओळखली जाते.
हिना पांचाळने २०१४ साली तिच्या सिने कारकीर्दीला सुरूवात केली. पण अभिनेत्रीऐवजी आयटम गर्ल म्हणून तिला जास्त प्रसिद्धी मिळाली. हिनाने अनेक दाक्षिणात्य चित्रपटात आयटम साँग केली आहेत.यामध्ये 'हुक्का', 'मोहल्ला', 'बेबो बेबो', 'राजू ओ राजू', 'बोगन' या सिनेमांचा समावेश आहे.