'तर स्टेजवर जाऊन मारतील...' , गौतमी पाटीलवर संतापल्या सुरेखा पुणेकर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2022 19:26 IST2022-11-25T19:25:24+5:302022-11-25T19:26:10+5:30
Surekha Punekar on Gautami Patil : लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी लावणी कलाकार गौतमी पाटीलवर निशाणा साधला आहे.

'तर स्टेजवर जाऊन मारतील...' , गौतमी पाटीलवर संतापल्या सुरेखा पुणेकर
लावणी कलाकार आणि इंस्टाग्राम स्टार गौतमी पाटील (Gautami Patil) सोशल मीडियावरील एक लोकप्रिय चेहरा आहे. तिच्या लावणी कार्यक्रमांना तुफान गर्दी होते. इतकेच नाही तर सोशल मीडियावरही तिचे व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत असतात. पण तिच्यावर अनेक वेळा टीका होताना दिसते. लावणी करताना ती करत असलेले हावभाव अश्लील असल्याचा आरोप तिच्यावर करण्यात येतो. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री आणि लावणीसम्राज्ञी मेघा घाडगे(Megha Ghadge)ने तिच्यावर सनसनीत टीका केली होती. दरम्यान आता लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर (Surekha Punekar) यांनीही तिला खडेबोल लगावले आहेत.
सुरेखा पुणेकर म्हणाल्या, 'ज्या लावणी सम्राज्ञीकडे कला आहे तिला प्रोत्साहन द्या. अपुरे कपडे घालणे आणि अश्लील वर्तन करत नाचणं याला लावणी म्हणत नाही. तसेच जी लावणीसम्राज्ञी अंगविक्षेप करून कला सादर करते. तिला लोकं सोडणार नाहीत. लावणी ही योग्य प्रकारेच सादर केली पाहिजे. नाहीतर महिला स्टेजवर जाऊन मारतील'.
सुरेखा पुणेकरांनी पुढे म्हटलंय, 'जी खरंच कलाकार आहे. जिची कला चांगली आहे तिला तुम्ही नक्कीच डोक्यावर घ्या तिला सपोर्ट करा'.
सोशल मीडियावर गौतमीचे अनेक डान्स व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात. तर तिची फॅन फॉलोइंगसुद्धा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.