सुश्रुत भागवत आणि उमेश कामतची हॅट्रीक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2018 06:20 AM2018-04-02T06:20:12+5:302018-04-02T11:50:12+5:30
एका विशेष दिग्दर्शकाचा सिनेमा म्हटला कि, त्यात अमुक हा अभिनेता असेल असा अंदाज आपण बांधू लागतो. हिंदीत ज्याप्रमाणे रोहित ...
ए ा विशेष दिग्दर्शकाचा सिनेमा म्हटला कि, त्यात अमुक हा अभिनेता असेल असा अंदाज आपण बांधू लागतो. हिंदीत ज्याप्रमाणे रोहित शेट्टी दिग्दर्शित सिनेमा म्हंटला कि जसे अजय देवगणचे नाव समोर येते, अगदी त्याप्रमाणेच मराठी सिनेसृष्टीतही केदार शिंदे - भरत जाधव, अवधूत गुप्ते - संतोष जुवेकर, संजय जाधव - स्वप्नील जोशी अशी दिग्दर्शक आणि अभिनेत्याची जोडी आपणास पाहायला मिळते. या जोडींमध्ये सुश्रुत भागवत आणि उमेश कामतयांचेदेखील नाव ओघाने आलेच ! सध्या हि जोडी झेलू इंटरटेंटमेंटस निर्मित 'असेही एकदा व्हावे' या सिनेमातून पुन्हा प्रेक्षकांसमोर येत असून, यापूर्वी मुंबई टाईम आणि पेइंग घोष्टमधून हि जोडी प्रेक्षकांसमोर आली होती. विशेषम्हणजे सुश्रुत -उमेशची ही दिग्दर्शक - अभिनेता जोडी प्रेक्षकांनादेखील भरपूर आवडली असल्यामुळे, येत्या ६ एप्रिल रोजी प्रदर्शित होत असलेल्या 'असेही एकदा व्हावे' या सिनेमातून ही जोडी आपली हॅट्रीक पूर्ण करणार आहे.
उमेश कामतच्या या कास्टिंगबद्दल बोलताना, 'असेही एकदा व्हावे' सिनेमासाठी उमेशचा सर्वातआधी विचार केला होता असे सुश्रुत भागवत सांगतात. 'उमेश आणि मी आता एकत्र तिसरा चित्रपट करताना एक गोष्ट महत्वाची होतीआणि ती म्हणजे उमेश ला मला काय हवं आहे हे सांगावं लागत नाही. एकतर उमेश सेटवर येताना त्याचा अभ्यास पुर्ण करून येतो आणि मला नक्की काय हवं आहे हे त्याला न सांगताचं कळतं. वेगळ्या ढंगाची प्रेमकहाणीमांडताना उमेश कामत हा एकच पर्याय असु शकतो' असे सुश्रुत सांगतात.
एप्रिल महिन्याच्या उन्हाळी सुट्टीत प्रेक्षकांना मनोरंजनाची परिपूर्ण मेजवानी घेऊन येणाऱ्या या सिनेमात तेजश्री प्रधानचीदेखील प्रमुख भूमिका आहे. शर्वाणी - सुश्रुत ह्या लेखक द्वयी चा देखील हा तिसरा चित्रपट आहे. या सिनेमाचीमधुकर रहाणे यांनी निर्मिती केली असून रविंद्र शिंगणें यांचे बहुमुल्य सहकार्य यात लाभले आहे. यात उमेश-तेजश्रीबरोबरच शर्वाणी पिल्लई, डॉ. निखील राजेशिर्के, चिराग पाटील, कविता लाड आणि अजित भुरे यांचीदेखील भूमिकाआहे.